सोलापूर : जिल्ह्यात नवे ४१३ रुग्ण; ७२३ जणांची कोरोनावर मात

बाधितांपेक्षा बरे होणारेच अधिक
Corona
Corona sakal

सोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. शहरात मंगळवारी ७३ तर ग्रामीणमध्ये ३४० रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे यादिवशी ७२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्‍त होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. तरीही, ग्रामीण व शहरातील प्रत्येकी तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता प्रशासनाला मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलावे लागणार आहे.

Corona
संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

कोरोना चाचण्यांचे प्रमाण अजूनही अडीच ते तीन हजारांवर गेलेले नाही. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमध्ये जास्त तीव्रता नसल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे चित्र आहे. तरीही, पंढरपूर, बार्शी, माळशिरस या तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. तर शहरातील रामवाडी, दाराशा, सोरेगाव या केंद्रांवरील पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी केडगाव (ता. करमाळा) येथील ७० वर्षीय पुरुष, नवीन विडी घरकूल (ता. दक्षिण सोलापूर) येथील ५० वर्षीय पुरुषाचा आणि अक्‍कलकोटमधील विजय चौकातील ५९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Corona
TRAI कडून मार्चमध्ये 5G साठी शिफारस; 2022 मध्ये सुरु होईल सेवा

शहरातील रेल्वे लाईन (डफरीन चौक) येथील ७३ वर्षीय महिलेचा, विजयपूर रोडवरील ९० वर्षीय महिलेचा आणि चित्रमंदिर परिसरात ५५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला. तरीही, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १६ हजार ९१५ रुग्णांपैकी दोन लाख सात हजार ५७९ रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही

शहर- ग्रामीणमधील आतापर्यंत ७१६ व्यक्‍तींना म्युकरमायकोसिसची बाधा झाली होती. त्यातील १०७ रुग्णांचा त्या आजाराने बळी घेतला. जीवघेण्या आजाराची संघर्ष करीत तब्बल ६०९ रुग्णांनी त्यावर यशस्वीपणे मात केली. दिलासादायक बाब म्हणजे सद्यस्थितीत जिल्हाभरात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com