esakal | वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो.

वर्षानंतरही शेतकऱ्यांना मिळेना भरपाई! 4246 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील चार लाख हेक्‍टरवरील पिकांना मागील वर्षी जून ते ऑक्‍टोबरमधील पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेली पिके (Crops) वाहून गेली आणि त्यावेळी शासनाकडून जिल्ह्यासाठी 548 कोटींची भरपाई मिळाली. मात्र, मार्चएंडमुळे वाटप न झालेले सुमारे दहा कोटींहून अधिक रक्‍कम शासनाला परत करावी लागली. त्यानंतर मोहोळ (Mohol) व दक्षिण सोलापूरमधील (South Solapur) चार हजार 246 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 67 लाखांची मागणी करावी लागली. मात्र, त्या शेतकऱ्यांना अजूनही शासनाकडून एक छदामही आलेला नाही.

हेही वाचा: 'सिद्ध होईल पुरुषार्थ, मुलीचा बाप होऊन बघ!'

रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांची वाढ झाली आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यंदा कोणत्याच शेती पिकाला दर नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही. मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील 461 तर मोहोळ तालुक्‍यातील तीन हजार 885 शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यांना भरपाई मिळावी म्हणून मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून पाठपुरावा होताना दिसत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा: निवडणुकीच्या घोषणेनंतर घटल्या 'डीसीसी'च्या ठेवी !

यावर्षी पंचनाम्याचे कोणतेही आदेश नाहीत

यंदा कमी-अधिक पाऊस झाला असून काही दिवसांपूर्वी सीना, भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. त्यावेळी नदी काठावरील गावांतील शेतकऱ्यांना फटका बसला. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर काही गावांमधील मंडलाधिकारी व तलाठ्यांनी त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची प्राथमिक पाहणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याबद्दल पंचनामे करावेत, असे कोणतेही शासनाकडून आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जून ते ऑक्‍टोबर 2020 मध्ये झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या काही शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळालेली नाही. त्या शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 67 लाखांची मागणी केली आहे. मदतीची रक्‍कम प्राप्त झाल्यानंतर ती संबंधितांच्या बॅंक खात्यात वर्ग होतील.

- क्षमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

loading image
go to top