50 हजारांच्या मदतीसाठी दोन लाख अर्ज !

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता नववर्षाच्या सुरुवातीलाच तिसऱ्या लाटेची सुरवात झाल्याचे चित्र आहे.
corona and money
corona and moneyesakal
Updated on
Summary

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता नववर्षाच्या सुरुवातीलाच तिसऱ्या लाटेची सुरवात झाल्याचे चित्र आहे.

सोलापूर : राज्यात कोरोनाने (Corona) मार्च 2020 मध्ये शिरकाव केला. मागील 21 महिन्यांत राज्यातील एक लाख 41 हजार 573 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत दिली जाणार असून त्यासाठी प्रत्येकास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आतापर्यंत दोन लाख अर्ज प्राप्त झाले. परंतु, त्यातील 50 टक्‍के अर्जांत त्रुटी आहेत. बॅंक खाते चुकीचे असल्याने अनेकांची रक्‍कम परत आली. या पार्श्‍वभूमीवर आता अर्जदाराच्या आधारलिंकवरुन मदतीची रक्‍कम थेट त्याच्या बॅंक खात्यात वर्ग केली जाणार आहे.

corona and money
कोरोना निर्बंधाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच ;अजित पवार

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता नववर्षाच्या सुरुवातीलाच तिसऱ्या लाटेची सुरवात झाल्याचे चित्र आहे. मागील दोन्ही लाटेचा अंदाज घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून तिसऱ्या लाटेतील मनुष्यहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी 15 वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचली जात आहे. तत्पूर्वी, कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेक कुटुंबाचा आधार हिरावला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी आधार म्हणून राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रत्येकी 50 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जवळपास एक हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 हजार लाभार्थ्यांसाठी दोनशे कोटी रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. लाभार्थ्यांसाठी आणखी एक हजार कोटींचा निधी शिल्लक असून अर्जांची पडताळणी करुन तो वितरीत केला जात आहे. चुकीचे अर्ज करुनही त्यात दुरुस्ती न करणाऱ्यांची खात्री करून मदतीची रक्‍कम आधारलिंकवरून थेट त्यांच्या बॅंक खात्यात पाठविली जाणार आहे. जानेवारीअखेर सर्वांनाच मदत मिळेल, असा विश्‍वास मदत व पुनर्वसन विभागाने व्यक्‍त केला आहे.

corona and money
चिमुकले झाले 'लसवंत'! पुण्यात आठ केंद्रावर दिली कोरोना लस

कोरोना मृतांची सद्यस्थिती...

- एकूण मृत्यू- 1,41,573

- आतापर्यंत अर्ज अपलोड- 2.09 लाख

- मदत मिळालेले लाभार्थी- 40,000

- मदतीची शिल्लक रक्‍कम- 1,000 कोटी

कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजारांची मदत केली जात आहे. राज्यभरातून जवळपास दोन लाख अर्ज आले असून त्यातील अनेक अर्जातील माहिती चुकीच्या पध्दतीने भरली आहे. त्यांना पुन्हा एक संधी दिली जाईल.

- संजय धारुरकर, प्रभारी संचालक, मदत व पुनर्वसन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com