भीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत

भीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत
Summary

पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले.

सोलापूर : लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील भीमा नदीत वाहून गेलेल्या चार चिमुकल्यांच्या कुटुंबियांना शहर युवासेनेने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 51 हजारांची मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. (51 thousand help to the families of chimukalya who drowned in bhima river)

भीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत
दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

वाढदिवसाचा अनावश्‍यक खर्च टाळून गोरगरिबांना मदत करावी, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून लवंगीतील पारशेट्टी व तानवडे परिवाराला मदत केली. काही दिवसांपूर्वी भीमा नदीत पोहायला गेल्यानंतर दोन मुली आणि दोन चिमुकल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी त्या कुटुंबियांना भेट दिली. त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, परंतु मदत कोणीच दिली नाही. दु:खातील त्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी या हेतूने युवासेनेने ही मदत केली. यावेळी युवा सेना शहरप्रमुख विठ्ठल वानकर, जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे, जिल्हा सचिव योगेश भोसले, उपजिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप आणि अतुल नवले उपस्थित होते.

भीमा नदीत बुडालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना 51 हजारांची मदत
काय सुरु, काय बंद? : जाणून घ्या सोलापुरातील स्थिती

पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही लवंगीतल दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला मदत केली. ही मदत नसून ते आमचे कर्तव्य आहे. त्यांना शासनाकडून आणखी मदत मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- विठ्ठल वानकर, युवासेना, शहरप्रमुख, सोलापूर

(51 thousand help to the families of chimukalya who drowned in bhima river)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com