esakal | सोलापूर महापालिका हद्दीत 523 चाचण्यांमध्ये सापडले 54 नवे कोरोना बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

दोघांचा मृत्यू 
आजच्या अहवालानूसार मृत पावलेल्या दोन व्यक्तींमध्ये विजापूर रोडवरील आदित्य नगर परिसरातील 38 वर्षिय पुरुषाला 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 23 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. मृत पावलेले दुसरी व्यक्ती मजरेवाडी परिसरातील ताकमोगे वस्ती येथील 76 वर्षिय पुरुष असून 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ वर्षापासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तीन वर्षांपूर्वी त्यांची एन्जोप्लास्टी झाली होती. एक वर्षापासून ते डायलिसिसचा उपचार घेत होते. सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान 23 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. 

सोलापूर महापालिका हद्दीत 523 चाचण्यांमध्ये सापडले 54 नवे कोरोना बाधित 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 523 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 469 अहवाल निगेटिव्ह आले असून तो 54 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तीस जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या आता आठ हजार 117 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 465 जणांचा मृत्यू झाला असून 991 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा हजार 661 आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये सोलापूर कारागृह, होटगी नाका येथील महावीर चौक, न्यू पाच्छा पेठ, लष्कर मधील जयराम आपार्टमेंट, जुळे सोलापुरातील विशाल नगर, निर्मिती विहार लोखंडवाला रेसिडेन्सी, जुळे सोलापुरातील स्वागत नगर रोड, साखर पेठ, लष्करमधील इनामदार अपार्टमेंट, सैफुल येथील पाटील नगर, हत्तुरे वस्ती येथील स्वामी विवेकानंद नगर, सिद्धेश्वर पेठ, एकता नगर, एसटी कॉलनी गारमिंग सोसायटी, विजापूर रोडवरील जवान नगर, दमाणी नगर येथील सनसिटी, विडी घरकुल येथील सागर चौक, पुना नाका येथील पद्मश्री आपार्टमेंट, सम्राट चौकातील पंधे कॉलनी, मॉर्डन हायस्कूल जवळ, डफरीन हॉस्पिटल जवळ, मुरारजी पेठ, सिद्धराज हाउसिंग सोसायटी, बाळ्यातील श्रद्धा ऍलिगन्सजवळ, अशोक चौकातील मारगु विहार, जुळे सोलापुरातील गुरुदेव दत्त नगर, सोरेगाव, दक्षिण कसबा, भारत हाऊसिंग सोसायटी, विजापूर रोडवरील सुंदरमनगर, नवीन आरटीओ कार्यालयाजवळील ब्रह्मचैतन्य नगर, रामलाल चौकातील श्रद्धा एम्पायर, विजापूर रोडवरील वैष्णवी नगर, सिद्धेश्वर पेठ, जुळे सोलापुरातील चंदन नगर, रोहिणी नगर, इंद्रधनू अपार्टमेंट, विजापूर रोडवरील जयकुमार नगर, मड्डी वस्ती, मुरारजी पेठ अवंती नगर, बुधवार बाजार जवळील एम. एस. कॉम्प्लेक्‍स, वालचंद महाविद्यालयाच्या मागील एकता नगर, बेगम पेठ, कुमठा नाका येथील भारत नगर, मोहिते नगर येथील युनिटी अपार्टमेंट, रामलिंग सोसायटी, जुना देगाव नाका येथील गंगा नगर येथे आज नव्याने बाधित आढळले आहेत.

loading image
go to top