
सोलापूर : मुंबईत सुरू असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोचले असून, हैदराबाद व सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हैदराबाद गॅझेट लागू होण्याचा निर्णय झाल्यास निजामशाहीत समाविष्ट असलेली सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांना याचा लाभ होऊ शकतो. दोन वर्षांपासून याबाबत पाठपुरावा सुरू असून हा विषय शिंदे समितीसमोर मांडण्यात आलेला आहे. यासाठी आता पुन्हा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत मराठा आंदोलक पंडित ढवण यांनी व्यक्त केले.