
सोलापूर : विडी वळणारे, कपडे शिवणारा कामगार वर्ग तसेच हातावरचे पोट असलेले कुटुंब म्हणून पूर्व भागातील तेलुगू भाषिकांकडे पाहिले जायचे. घरातील कर्ता पुरुष व्यसनी आणि आईवर घरची जबाबदारी यामुळे मुलांचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष हे प्रखरतेने जाणवत होते. मात्र मागील दहा वर्षांपासून पूर्व भागाची ओळख बदलत असून सर्वाधिक युवकांचा कल हा लेखा विभागाकडे आहे. तर सर्वाधिक चार्टर्ड आकउंटटची संख्या ही पूर्व भागात आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीएच्या निकालात सोलापुरातील सहभागी २६ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी हे पूर्व भागातील तेलुगू भाषिक होते.