

Solapur Faces Service Setback as 600 Aaple Sarkar Centres Remain Locked
sakal
सोलापूर: गावातील नागरिकांना पॅनकार्ड, शासकीय योजनांच्या लाभाचे अर्ज, विविध विमा योजना, रिचार्ज, वाहन चालविण्याचा परवाना अशा सेवा गावातील आपले सरकार सेवा केंद्रातून (सीएससी) दिल्या जातात. पीकविमा भरणे, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांचे अर्ज भरणे अशीही कामे येथून होतात. पण, आता ज्या केंद्र चालकाने एक वर्षापूर्वी केंद्र सुरू केले, त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६०० केंद्रांचे आयडी लॉक करण्यात आले आहेत.