सोलापूर शहर जिल्ह्यात 642 नवे कोरोना बाधित, 11 जणांचा मृत्यू 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत 290 तर ग्रामीण भागात 352 अशा एकूण 642 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. कोरोनामुळे तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सात व्यक्ती या महापालिका हद्दीतील तर चार व्यक्ती या ग्रामीण भागातील आहेत. कोरोना चाचणीचे 846 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यातील 540 अहवाल महापालिका हद्दीतील तर 306 अहवाल ग्रामीण भागातील आहेत. 


आज एकाच दिवशी 430 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये 137 जण महापालिका हद्दीतील तर 293 जण ग्रामीण भागातील आहेत. आजच्या अहवालात मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील कोणार्क नगर येथील 71 वर्षिय पुरुष, पोगुल माळाजवळ रामवाडी परिसरातील 55 वर्षीय महिला, न्यू पाच्छा पेठ परिसरातील 59 वर्षिय पुरुष, विकास नगर जवळील कृषी नगर मधील 86 वर्षिय पुरुष, वेणुगोपाल नगर परिसरातील 75 वर्षिय पुरुष, पार्क चौक मुरारजी परिसरातील 81 वर्षिय पुरुष आणि भवानी पेठेतील जम्मा चाळ येथील 74 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील सोहाळे (ता. मोहोळ) येथील 43 वर्षिय पुरुष, पंढरपुरातील कराड रोड वरील दत्तनगर येथील एकूण 70 वर्षिय पुरुष, बार्शीतील कापड बाजार येथील 91 वर्षिय पुरुष, बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील 68 वर्षिय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजचा अहवालातून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Barber Services Become Costlier in Solapur from July 1; New Rates Announced
6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
Marathi News Esakal
www.esakal.com