

Solapur Devotees Orphaned After Mahasamadhi of Maa Geeta Bharti
Sakal
सोलापूर : आध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ आणि जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या प्रमुख, पहिल्या महिला महामंडलेश्वर माँ गीता भारती (संतोषी पुरी माता) यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथे वयाच्या ८५ व्या वर्षी महानिर्वाण झाले. सोलापूरसह देशभरात पसरलेल्या लाखो अनुयायांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता अहमदाबाद येथे धार्मिक विधींनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत.