पाण्याच्या बाबतीत उन्हाळा सुसह्य; उजनीत ६९.४५, मध्यम प्रकल्पामध्ये ५३.९२ टक्के पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ujjani Dam

पाण्याच्या बाबतीत उन्हाळा सुसह्य; उजनीत ६९.४५, मध्यम प्रकल्पामध्ये ५३.९२ टक्के पाणी

उत्तर सोलापूर : जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सध्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासण्याची शक्‍यता कमी आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे उजनी, मध्यम प्रकल्प त्याचबरोबर भीमा व सीना नद्यांवरील बंधाऱ्यांचा समावेश आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे येणाऱ्या या सर्वच प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ही ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. उजनी प्रकल्पामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणी आहे. त्यामुळे शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याचे दिसून येते. याशिवाय प्राधिकरणाकडे असलेल्या सात मध्यम प्रकल्पांमध्ये पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.

त्यामुळे या पाणीसाठ्याचा उपयोग शेती व पिण्यासाठी करता येणे शक्‍य होणार आहे. उजनी धरणातून नुकतेच भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या नदीवरील जवळपास २४ बंधाऱ्यांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचबरोबर मागील पंधरवड्यात उजनीचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून सीना नदीमध्ये सोडण्यात आले होते. त्यामुळे सीना नदीवर असलेल्या २४ बंधारे मध्ये सध्या ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सीना व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे एकरूख, हिंगणी, जवळगाव, मांगी, आष्टी, बोरी, पिंपळगाव ढाळे हे सात मध्यम प्रकल्प येतात. या मध्यम प्रकल्पांमध्ये ही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उजनी धरण शंभर टक्‍क्‍यांहून अधिक भरले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्‍यता फारशी दिसत नाही.

उजनी धरण

  • उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा कंसात मागील वर्षीचा पाणीसाठा : ६९.४५ टक्के (६१.१३)

  • उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात मागील वर्षीचा पाणीसाठा : ३७.२१ टीएमसी (३२.७५)

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा (टक्के)

एकरुख - ७७.०९, हिंगणी - ६७.४८, जवळगाव - २८.८७, मांगी - १३.४१, आष्टी - ७५.६२, बोरी - ४८.४१, पिंपळगाव ढाळे - २४.५४, एकूण उपयुक्त पाणीसाठा - ५३.९२ टक्के.

नद्यांमधील पाणीसाठा

  • भीमा नदीवरील २४ बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा : ५२ टक्के

  • सीना नदीवरील २४ बंधाऱ्यातील उपयुक्त पाणीसाठा : ७० टक्के

Web Title: 69 Per Cent Water Ujjani Dam And 53 Per Cent Water Other Project No Water Scarcity In Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..