Solapur Crime: आठ वाळू माफिया, दोन हातभट्टी विक्रेते तडीपार; पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई, हद्दपार केलेल्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष
कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे, दत्तात्रय तोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजू गायकवाड, आबा शेंडगे यांनी पार पाडली.
SP’s major crackdown: Eight sand mafia and two liquor sellers externed from district.sakal
पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यातील आठ वाळू माफियांच्या टोळीला पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. दुसरीकडे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याकडील दोन अवैध हातभट्टी व्यावसायिकांवरही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.