
नातेपुते : शिवराज्याभिषेक दिनी माळशिरस तालुक्यातील ८०० युवकांनी किल्ले रायगड येथे जाऊन शिवरायांना अभिवादन केले. शिवप्रसाद उद्योग समूह, दहिगाव (ता. माळशिरस) यांच्या तर्फे किल्ले रायगड वारीसाठी नातेपुतेमधून १६ बसगाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. वारीचा प्रारंभ प्रमुख पाहुणे अकलूजचे पोलिस उपअधीक्षक नारायण क्षीरगावकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे, संयोजक शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शरद मोरे यांच्या हस्ते झाला.