
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील म्हाड्यात सीना नदीचे पाणी गावात शिरले. ८ ते १० गावांमध्ये पाणी शिरले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावांना जोडणारे रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत.