esakal | खुषखबर! एसआरपीएफच्या 13 जवानांची कोरोनावर मात; सोलापुरातील 90 जवानांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'ला पहारा
sakal

बोलून बातमी शोधा

90 soldiers from Solapur guard Chief Minister Uddhav Thackeray 'Matoshri

एसआरपीएफचे समादेशक  श्री. केंडे म्हणाले...

  • - सोलापुरातून एसआरपीएफ जवानांच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी मुंबईत दाखल

- पहिल्या तुकडीतील 13 जवान होते पॉझिटिव्ह; उपचारानंतर सर्व जवान ठणठणीत झाले असून 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर ते बंदोबस्तासाठी रुजू होतील 
- 90 जवानांची एक तुकडी मातोश्री'वर तर दुसरी तुकडी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेअंतर्गत आणि तिसरी तुकडी धारावी व आंंटाफील या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे

  • - 45 दिवसांच्या बंदोबस्तानंतर मातोश्रीवरील 90 जवान देतील मुंबईत दुसऱ्या ठिकाणी बंदोबस्त; कोरोनावर मात केलेले 13 जवान आहेत साकीनाका पोलीस ठाण्यात होम क़्वारंटाईन

खुषखबर! एसआरपीएफच्या 13 जवानांची कोरोनावर मात; सोलापुरातील 90 जवानांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री'ला पहारा

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील एसआरपीएफ कॅम्पमधून मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानासह अन्य ठिकाणी बंदोबस्तासाठी 270 जवानांच्या तीन तुकड्या दाखल झाल्या आहेत. बंदोबस्तासाठी दाखल झालेल्या एका तुकडीतील 9 जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. तर त्यांच्या संपर्कातील आणखी चार जवानांना कोरोना या विषाणूची लागण झाली होती. आता हे सर्व जवान उपचारानंतर ठणठणीत झाले असून 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा कामावर रुजू होतील, अशी माहिती सोलापुरातील एसआरपीएफ कॅम्पचे समादेशक रामचंद्र केंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबईत कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानंतर सोलापुरातील एसआरपीएफ कॅम्पमधून सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बंदोबस्तासाठी 90 जवानांची तुकडी मुंबईला रवाना करण्यात आली. मुंबईत दाखल झालेल्या तुकडीतील 9 जवान वैद्यकीय तपासणीनंतर कोरूना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर तुम्हाला यायला उशीर झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगत  त्यांचा बंदोबस्त नाकारला आणि त्यामुळेच त्यांना  मुंबईतील पोलीस आयुक्तालय समोरील रस्त्यांवर रात्र जागून काढावी लागली. त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आणि त्याची दखल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर या जवानांची राहण्याची व्यवस्था करून पॉझिटिव्ह आढळलेल्या जणांवर उपचार सुरू करण्यात आले. कोरोनाबाधित जवानांनी या विषाणूवर यशस्वी मात केली आहे. तीन तुकड्यांमाधील प्रत्येकी 90 जवानांची तुकडी तीन वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे, असेही केंडे म्हणाले.

एसआरपीएफचे समादेशक  श्री. केंडे म्हणाले...

  • - सोलापुरातून एसआरपीएफ जवानांच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी मुंबईत दाखल
  • - पहिल्या तुकडीतील 13 जवान होते पॉझिटिव्ह; उपचारानंतर सर्व जवान ठणठणीत झाले असून 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर ते बंदोबस्तासाठी रुजू होतील 
  • - 90 जवानांची एक तुकडी मातोश्री'वर तर दुसरी तुकडी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेअंतर्गत आणि तिसरी तुकडी धारावी व आंंटाफील या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहे
  • - 45 दिवसांच्या बंदोबस्तानंतर मातोश्रीवरील 90 जवान देतील मुंबईत दुसऱ्या ठिकाणी बंदोबस्त; कोरोनावर मात केलेले 13 जवान आहेत साकीनाका पोलीस ठाण्यात होम क़्वारंटाईन
loading image