
सोलापूर : सोलापूरसह राज्यात गोवर्गीय पशुधनाला लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पशुपालकांनी आपल्या पशुधनास लस टोचून घ्यावी. शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले आहे. तसेच रोग नमुने गोळा करण्याकरिता सर्वेक्षणाच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्तांना दिल्या आहेत.