esakal | महापालिका हद्दीत 95 कोरोना बाधित, एकाचा मृत्यू, 29 जण कोरोना मुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सोलापूर शहरातील एकूण बाधितांची संख्या सहा हजार 188 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 395 जणांचा मृत्यू झाला असून सध्या रुग्णालयात 1 हजार 171 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 हजार 622 जण कोरोना मुक्त झाले आहेत . 

महापालिका हद्दीत 95 कोरोना बाधित, एकाचा मृत्यू, 29 जण कोरोना मुक्त 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत 95 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. 29 जन कोरोना मुक्त झाले असून कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही आज स्पष्ट झाले आहे. मृत पावलेली व्यक्ती नेहरूनगर येथील वसंतराव नाईक नगर परिसरातील 72 वर्षांचे पुरुष आहेत. 5 ऑगस्टला त्यांना उपचारासाठी नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. 19 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. 

आज नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये केगाव येथील शिवशंकरनगर, जुना विडी घरकुल मधील भारत नगर, होटगी नाक्‍यावरील बॉइज्‌ होस्टेल, उत्तर कसब्यातील नागरे गल्ली, आकाशवाणी केंद्राजवळील जगदंबा नगर, होटगी रोड वरील ऋषीनगर, जुळे सोलापुरातील धोंडे नगर, लक्ष्मी मार्केट रोड दक्षिण कसबा, भवानी पेठेतील हनुमान नगर, बाळ्यातील बार्शी रोड, एमआयडीसी मधील सिद्धरामेश्वर नगर, अक्कलकोट रोड वरील हेरिटेज मनीधारी एम्पायर, सैफुल परिसरातील स्वामी विवेकानंदनगर, चौगुले वस्ती सुभाषनगर, आसऱ्यातील वीनस अपार्टमेंट, ओम नमः शिवायनगर, जोडभावी पेठेतील मनपा क्वॉर्टर, रेल्वे लाईन्स गंगा निवास, सिव्हिल हॉस्पिटल रेसिडेन्सी क्वॉर्टर, होटगी नाक्‍यावरील सिव्हील बॉइज्‌ हॉस्टेल, जुळे सोलापुरातील बॉम्बे पार्क, साखर पेठ, पूर्व मंगळवार पेठ, विडी घरकुल ग्रुप ए, रामवाडी हॉस्पिटल जवळील धोंडीबा वस्ती, जुना कुंभारी नाका येथील आदर्श नगर, मजरेवाडी परिसरातील परमेश्वर नगर, विजापूर रोडवरील नम्रता नगर, जुळे सोलापुरातील चंद्रलोकनगरी, न्यू पाच्छा पेठ अशोक चौक, विजापूर रोडवरील पापारामनगर, स्वामी विवेकानंदनगर, जुळे सोलापुरातील अभिषेक कॉम्प्लेक्‍स, नई जिंदगी, मुळेगाव येथील गंगाई केकडे नगर, उत्तर कासबा, सातनगर गांधी नगर झोपडपट्टी, दमाणीनगर मधील न्यू लक्ष्मी चाळ, न्यू बुधवार पेठ, शनिवार पेठ, भवानी पेठ घोंगडे वस्ती, बंडप्पा नगर बॉम्बे पार्क जवळ, सैफुल विजापूर रोड आयएमपी ग्रीन, भारती विद्यापीठ जवळील सन्मतीनगर, कुमठा नाका परिसरातील हुच्चेश्वर नगर, मुरारजी पेठ, सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ, विजापूर रोडवरील प्रतापनगर तांडा, सैफुल रोडवरील भारत नगर, हत्तुरे वस्ती जुळे सोलापूर, शेळगी येथील योगीनाथ सोसायटी, देशमुख पाटील वस्ती लक्ष्मी पेठ, जुळे सोलापुरातील रुबीनगर, बाळे यातील वसंत विहार, बाळे येथील डांगे नगर, एन. जी. मिल चाळ, संचार प्रेस जवळ होटगी रोड, देगाव रोड वरील लक्ष्मीनगर विठ्ठल मंदिराजवळ, विजापूर रोडवरील रोहिणी नगर, आयटीआय शासकीय वस्तीगृह, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोडवरील कमला नगर, कुमठा नाका येथील भारतनगर येथील बाधित यांचा समावेश आहे.

loading image
go to top