
सोलापूर : दोन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ११ हजार ७७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ९९ हजार ८६२ घरांना मंजुरी देण्यात आली असून ८० हजार १३१ जणांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. २०२४-२५ या वर्षातील १६९५ तर २०२५-२६ मधील ६१८५ घरांना मंजुरी देणे प्रलंबित आहे.