वाळूज येथे वीजेचा शॉक लागून बैलाचा मृत्यू

दहा दिवसांपूर्वी वादळात तारांसह वीजेचा खांब पडल्याने अपघात
electric shock dead esakal news
electric shock dead esakal newsesakal
Summary

ऐन पेरणीत शेतकऱ्यासमोर पेरणी कशी करायची हे संकट उभा राहीले आहे.

वाळूज (सोलापूर): दहा दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसात वाळूज (ता.मोहोळ) शिवारात वीजेच्या तारांसह कोसळललेल्या खांबांवरील तारांना बैलाचा स्पर्श झाला. त्यावेळी वीजेचा करंट लागून त्याच जागेवरच मृत्यू झाल्याने शेतकऱ्याच्या रबीच्या पेरणीचा खोळंबा झाला आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी च्या वादळात पडलेला वीजेच्या खांबाबाबत विद्युत पारेषण कंपनीच्या नरखेड येथील उपविभाग कार्यालयाला कळवूनही कामात दिरंगाई व वीज प्रवाह बंद न केल्याने हलगर्जीपणामुळे बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन पेरणीत शेतकऱ्यासमोर पेरणी कशी करायची हे संकट उभा राहीले आहे.

electric shock dead esakal news
वाळूज : शरीरसुखाची मागणी करत विवाहितेचा विनयभंग

ज्ञानेश्वर रामहरी कादे असे वीजेचा शॉक लागून मृत पावलेल्या बैलाच्या मालकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी मोहोळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून ही घटना मंगळवारी (ता.१९)वाळूज शिवारात घडली. मंगळवारी ईद-ए-मिलाद ची सुट्टी असल्याने बुधवारी बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले. वीजेचा करंट लागून त्यात बैलाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एस.बी.जाधव (पो.ना.१८७३) करीत आहेत. याबाबत ज्ञानेश्वर कादे यांनी दिलेल्या माहिती वरून दहा दिवसांपूर्वी वाळूज शिवारातील गट नं.१६१/२ या शेतात वीजेचा खांब तारांसह मोडून पडला होता.

electric shock dead esakal news
झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ, वाळूज परिसरात पन्नास रुपये भाव

याबाबत नरखेड येथील विद्युत पारेषण कंपनीच्या उपविभाग कार्यालयाला कळवले होते. नंतर येथील वायरमन श्री.कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मंगळवारी मोडलेला खांब उभारण्यासाठी बैलगाडीत पोल घालून उभा करतात, त्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वर कादे यांना फोन करून तुमची गाडी पाहिजे असे सांगितले. रबीची चालू पेरणीच्या तिफणीचे बैल सोडवून त्यांनी गाडी जुंपली व वायरमन जवळ गाडी नेऊन पोहच केली. त्यावेळी तुटलेल्या तारांतील वीज प्रवाह तारा सोडवून बंद करणे बंधनकारक असताना फ्यूज काढून प्रवाह बंद केला. तिथे कोणीही व्यक्ती थांबली नाही. नेहमी प्रमाणे फेज गेली असे समजून अज्ञात शेतकर्‍याने फ्यूज बसवून वीज प्रवाह चालू केला. नेमकं याच वेळी ज्ञानेश्वर कादे यांनी बैलगाडी पोल उभारण्यासाठी तिथे सोडून बैल घेऊन तिफणीकडे स्वतःच्या शेतात जात असताना वीजेच्या तारांचा स्पर्श बैलाला झाला आणि काही कळायच्या आत वीजेचा करंट लागून शेतकऱ्या समोर तडफडून बैलाचा मृत्यू झाला. या घटनेला वीज पारेषण कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात (नोंद क्र.२२/२०२१) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com