बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमी

बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमी
बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमी
बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमीCanva
Updated on
Summary

सोलापूरहून मंगळवेढ्याकडे महामार्गावरील दुभाजकावरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

बेगमपूर (सोलापूर) : सोलापूरहून (Solapur) मंगळवेढ्याकडे (Mangalwedha) महामार्गावरील दुभाजकावरून भरधाव वेगाने व चुकीच्या बाजूने निघालेल्या ट्रकने कारला समोरून जोरदार धडक (Accident) दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोलापूर- मंगळवेढा महामार्गावरील बेगमपूर (ता. मोहोळ) (Begumpur) गावाजवळील स्टेट बॅंकेसमोर सोमवारी (ता. 21) रात्री एकच्या सुमारास घडली. सुनील बनसिद्ध वाघमारे (वय 31, रा. टिळकनगर, मजरेवाडी, सोलापूर) असे अपघातातील मृताचे नाव असून, गिरीश ब्रह्मदेव माने (रा. अरविंद धाम पोलिस वसाहत, सोलापूर) व हर्षवर्धन मलिक सर्वगोड (वय 35, रा. गजानन नगर, मजरेवाडी सोलापूर )अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमी
भोंदू मनोहरमामाचा 'अटकपूर्व'चा प्लॅन पोलिसांनी लावला उधळवून!

मध्यरात्रीनंतर झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिस व गावातील ग्रामसुरक्षा दलातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकून पडलेल्या दोघांना बाहेर काढून तत्काळ सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले तर एकाला कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले. परंतु दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले.

याबाबत कामती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरीश माने व त्यांचे मित्र हे सोलापूरहून एका खासगी कामानिमित्त एमएच 13 डीटी 1891 या कारमधून सांगोला येथे गेले होते. काम संपवून ते रात्री उशिरा परत सोलापूरला निघाले होते. दरम्यान, सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने सिमेंट घेऊन भरधाव वेगाने व चुकीच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच 13 डीक्‍यू 1270) महामार्गावरील बेगमपूर येथील स्टेट बॅंकेसमोर या कारला समोरून जोरदार धडक दिली. यामुळे कारमधील चालकाशेजारी बसलेले सुनील वाघमारे हे जागीच गतप्राण झाले. अन्य दोघांच्या हात, पाय व डोक्‍याला जबर मार लागला. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरील दुभाजक तोडून ट्रकने कारला समोरून जोरदार धडक दिली. परिणामी सोलापूरकडे निघालेली कार उलट दिशेला काही अंतर फरफटत नेली व घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ट्रक थांबला. घटनेनंतर ट्रक चालकाने पलायन केले .

बेगमपूर येथे ट्रक व कारचा भीषण अपघात! एक ठार, दोघे जखमी
कोरोना काळात राज्यात 18 हजार अपघाती मृत्यू!

दरम्यान, घटनेनंतर काही वेळातच कामती पोलिस घटनास्थळी पोचले. मध्यरात्रीनंतरची वेळ असूनही महामार्गावर घडलेल्या या अपघाताच्या मदतीसाठी गावातील ग्रामसुरक्षा दलातील लखन ताकमोगे व अमर गोडसे, संजय चव्हाण, पपूल शेख, गजानन गुंडाळे या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकून पडलेल्या प्रथम दोघांना बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ सोलापूरला पाठविले. अन्य एकाला अक्षरशः कारचा दरवाजा गॅस कटरने कापून बाहेर काढले. या अपघातात कारचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षा कुमार कांबळे (रा. अरविंदधाम पोलिस वसाहत, सोलापूर) यांनी कामती पोलिसांत फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापू दुधे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com