esakal | Solapur : तीन लाखांच्या 'मकाऊं'चा मृत्यू! शिवसेनेच्या धाराशिवकरांनी वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

तीन लाखांच्या 'मकाऊं'चा मृत्यू!

'तुमचा झाला खेळ, माझा गेला जीव' असा बोलका फलक व मकाऊ पोपटाचे छायाचित्र लावून शिवसेनेचे महेश धाराशिवकर यांनी पोपटाला श्रद्धाजंली वाहिली.

तीन लाखांच्या 'मकाऊं'चा मृत्यू! धाराशिवकरांनी वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
अरविंद मोटे

सोलापूर : महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला (Mahatma Gandhi Zoo, Solapur) अनेकदा जाहिरात देऊनही पशुचिकित्सक व संचालक न मिळाल्याने प्राण्यांचे हाल सुरू आहेत. तीन लाख रुपये खर्च करून आणलेल्या मकाऊ पोपटांचा (Macau parrots) नुकताच मृत्यू झाल्याने शिवसेनेचे (Shivsena) महेश धाराशिवकर (Mahesh Dharashivkar) यांनी मंगळवारी आंदोलन केले. 'तुमचा झाला खेळ, माझा गेला जीव' असा बोलका फलक व मकाऊ पोपटाचे छायाचित्र लावून पोपटाला श्रद्धाजंलीही अर्पण केली.

हेही वाचा: महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत 'सकाळ' प्रथम!

तीन महिन्यांपूर्वी प्राणी संग्रहालाने पशुवैद्यकीय अधिकारी व संचालक पदाच्या जाहिराती दिल्या होत्या. कंत्राटी तत्त्वावरील या पदासाठी अत्यल्प मानधन महापालिकेने देऊ केले होते. त्यामुळे हे पद भरले गेले नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय प्राण्यांची निगराणी सुरू आहे. प्राण्यांच्या खाणे व हालचालींवरून त्यांचे आजार ओळखावे लागतात. त्यानुसार त्यांना खाद्य देणेही आवश्‍यक असते. मात्र पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने येथील प्राण्यांचे हाल सुरू आहेत.

तीन लाखांच्या पोपटांचा मृत्यू

2016 मध्ये तीन लाख रुपये खर्च करून दोन मकाऊ पोपट प्राणी संग्रहालयात आणले होते. विदेशी पक्षी व देशी पक्षी एकत्र ठेवू नका, अशी सूचना केंद्रीय प्राणी संग्रहालय संचालनालयाच्या पथकाने केल्यानंतर या दोन मकाऊ पोपटांना वन विभागाच्या परवानगीने सिद्धेश्‍वर वनविहारात ठेवण्यात आले होते. मात्र, मागील महिन्यात एका पोपटाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी (ता. 10) दुसऱ्या पोपटाचाही मृत्यू झाला. यामुळे प्राणी व पक्षी मित्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महापालिकेसमोर श्रद्धांजली

प्राणी संग्रहालयाच्या हलगर्जीपणामुळे मकाऊ पोपटाचा जीव गेला आहे. यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे महेश धाराशिवकर यांनी "तुमचा झाला खेळ माझा गेला जीव' असा फलक व पोपटाचे छायाचित्र लावून पोपटाला श्रद्धाजंली अर्पण केली. बाळगोपाळांच्या मनोरंजनासाठी आणलेल्या या पोपटाची योग्य रहिवास व अन्नपाण्याची व्यवस्था करणे महापालिकेची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी योग्य व्यवस्था न केल्याने सिद्धेश्‍वर वनविहारात या पोपटांचा जीव गेला.

हेही वाचा: पोटच्या मुलानेच केला आईचा खून! बार्शी शहरातील घटना

प्राणी संग्रहालयाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलतर्फे निवेदन देणे, मेणबत्ती लावून श्रद्धांजली अपर्ण करणे, असे शांततामय मार्गाने या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.

- पप्पू जमादार, पर्यावरणप्रेमी

loading image
go to top