पत्नीसोबत एक वर्ष अनैसर्गिक शारीरिक संबंध! पत्नीची पोलिसांत धाव

पत्नीसोबत एक वर्ष अनैसर्गिक शारीरिक संबंध! पत्नीची पोलिसांत धाव
Crime News
Crime Newssakal
Summary

या प्रकरणातील पती, सासू, सासरा, दोन नणंद व पतीच्या आतेभावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर : मुलगा व्हावा म्हणून सासूच्या सांगण्यावरून पती ठरावीक दिवशीच शारीरिक संबंध ठेवत होता. इतरवेळी त्याने वारंवार अनैसर्गिक व राक्षसी शरीरसंबंध ठेवले आणि त्यातून मला शारीरिक इजादेखील झाली आहे. विवाह झाल्यापासून एक वर्ष पतीने अत्याचार केला आणि तब्येत खालावल्यानंतर सासरच्यांनी मे 2020 रोजी माहेरी आणून सोडले. आता ते पतीचा दुसरा विवाह लावून देऊन मला घटस्फोट (Divorce) मागत असल्याची तक्रार एका विवाहितेने विजापूर नाका पोलिसांत (Vijapur Naka Police) दिली. पोलिसांनी या प्रकरणातील पती, सासू, सासरा, दोन नणंद व पतीच्या आतेभावाविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

Crime News
एसटी वाहतूक सुरू होणार! परिवहनमंत्री घेणार 'हा' निर्णय

विवाहानंतर सासरच्यांनी एका महिन्यातच त्यांचे रूप दाखवायला सुरुवात केली. तुझी लायकी नाही, तुझे आई-वडील आमच्यापेक्षा खूप गरीब आहेत, तू दिसायला सुंदर नाही, वयाने कोवळी आहेस म्हणून पती, सासू, सासरा व दोन्ही नणंद यांनी छळ केला. पतीने सासूच्या सांगण्यावरून मर्यादेत शरीरसंबंध ठेवले आणि इतरवेळी राक्षसी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केले. अनैसर्गिक अत्याचाराला विरोध केल्याने पतीने मारहाण केली व माहेरील व्यक्‍तींना मारण्याची धमकीही दिली. याबाबत सासू, सासऱ्याला सांगितल्यानंतर त्यांनी, मुलगा होण्यासाठी ते रास्तच असल्याचे सांगून गप्प बसविले.

अमावास्या, पौर्णिमेला पतीला त्यांनी किचनमध्ये झोपण्याचे बंधन घातले होते. वेळापत्रकाला बगल देऊन पतीने शरीरसंबंध ठेवल्याने आता मुलगा होणार नाही म्हणून त्यांनी गर्भपातही केला, असे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, अनैसर्गिक संबंधांमुळे तब्येत बिघडली, काहीतरी होईल म्हणून सासऱ्यांनी माहेरी आणून सोडले. त्यानंतर पुन्हा ते न्यायला आलेच नाहीत. त्यांनी आता घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दिला असून, पतीचा दुसरा विवाह लावून देतो असे सांगितल्याचेही विवाहितेने विजापूर नाका पोलिसांना सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास विजापूर नाका पोलिस करत आहेत.

Crime News
'सेंट्रल बॅंक'मध्ये UG, PG, MBA, PhD तरुणांना नोकरीची संधी!

फिर्यादीतील ठळक बाबी...

  • 23 मे 2019 रोजी झाला होता विवाह; सासरच्यांकडून महिन्यानंतर छळ सुरू

  • विवाहात माहेरच्यांनी दिले 21 तोळे सोने, 51 हजार कपड्यांसाठी, पाच लाख संसार साहित्यासाठी, 17 लाख साखरपुडा अन्‌ विवाहासाठी खर्च

  • जुलै 2019 पासून छळ सुरू; अंधश्रद्धा पाळणाऱ्या सासूने सुनेला मुलगा व्हावा म्हणून बनविले पती-पत्नीच्या शरीरसंबंधाचे वेळापत्रक

  • सून गरोदर राहिल्यानंतर तिच्या मुलाने वेळापत्रक पाळले नाही म्हणून सुनेचा केला गर्भपात

  • काम वेळेत पूर्ण न झाल्यास व कामात चूक झाल्यानंतर उठाबशा काढून सुनेला गेटवर बसवून ठेवायचे

  • अनैसर्गिक अत्याचारामुळे झाली शारीरिक इजा; तब्येत खालावली म्हणून सासरच्यांनी सुनेला माहेरी आणून सोडले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com