एकीशी साखरपुडा करून ठेवला शरीरसंबंध अन्‌ पळून गेला दुसरीसोबत! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकीशी साखरपुडा करून ठेवला शरीरसंबंध अन्‌ पळून गेला दुसरीसोबत!
एकीशी साखरपुडा करून ठेवला शरीरसंबंध अन्‌ पळून गेला दुसरीसोबत!

एकीशी साखरपुडा करून ठेवला शरीरसंबंध अन्‌ पळून गेला दुसरीसोबत!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथील जुने विडी घरकुल परिसरातील कोंडा नगरातील 25 वर्षीय तरुणाने एका मुलीशी ओळख करून 6 नोव्हेंबरला साखरपुडा केला आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यांनतर काही दिवसांतच तो तरुण दुसऱ्या मुलीला घेऊन पसार झाला आहे. जय श्रीनिवास गुर्रम (रा. कोंडानगर, जुने विडी घरकुल) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police Station, Solapur) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

हेही वाचा: पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना उत्पन्नवाढीचेही टार्गेट!

जय गुर्रम हा एका कार्यालयात जॉब करत होता. त्या ठिकाणी एका मुलीसोबत त्याने ओळख वाढविली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. नातेवाइकांच्या संमतीने त्या दोघांचा साखरपुडाही पार पडला. 6 नोव्हेंबर रोजी साखरपुडा झाल्यानंतर साखरपुडा होऊन 18 दिवस होण्यापूर्वीच त्याने विवाह जमलेल्या मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. मात्र, विवाह होण्यापूर्वीच जय गुर्रम हा एका मुलीला घेऊन घरातून पसार झाला आहे. त्याची माहिती मिळताच त्या मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आता जय गुर्रम या तरुणाचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा: रणनीतीचा पहिला डाव! 'MIM'च्या रडारवर कॉंग्रेस अन्‌ 'राष्ट्रवादी'

एमआयडीसी परिसरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

एमआयडीसी परिसरातील मुळेगाव रोडवरील एका नगरातील 16 वर्षीय तरुणी 19 नोव्हेंबरला घरातून निघून गेली आहे. मैत्रिणीच्या विवाहाला जाऊन येते, म्हणून ती घरातून निघाली. मात्र, ती पुन्हा घरी परतलीच नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी नातेवाइकांकडे चौकशी केली, परंतु तिचा पत्ता लागला नाही. कोणत्या तरी तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले असावे, असा अंदाज तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांकडे व्यक्‍त केला.

loading image
go to top