'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी

'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी
'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी
'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकीCanva
Summary

प्रकाश राठी व सागर राठी या दोघांसह धमकी देणाऱ्या त्या मोबाईल क्रमांकावरील व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : तुम्ही आम्हाला एक कोटी रुपये द्या, नाहीतर मी तुमच्या कुटुंबास संपवितो, अशी दमदाटी करून शिवीगाळ केली. या प्रकरणी विष्णुदास जयकिसन राठी (व्यावसायिक, रा. सम्राट चौक, डी-मार्टशेजारी) यांनी पुतण्याविरुद्ध जोडभावी पोलिसांत (Jodbhavi Police Station, Solapur) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश राठी व सागर राठी (रा. वृंदावन सोसायटी) या दोघांसह धमकी देणाऱ्या त्या मोबाईल क्रमांकावरील व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी
सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेसमध्ये तस्करी, सोलापुरातून गांजा जप्त

वडिलोपार्जित प्रॉपर्टीत आम्हाला हिस्सा कमी दिला, आमच्याकडे आता काहीच नाही म्हणत पुतण्याने चुलत्याला दारूच्या नशेत धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यासाठी त्याने त्रयस्थ व्यक्‍तीची मदत घेतल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले. दरम्यान, त्या व्यक्‍तीने, तुम्ही बाळासाहेब वाघमारे यांच्या कार्यालयात येऊन भेटा, अशी भाषा वापरल्याचेही फिर्यादी विष्णुदास राठी यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचिम हे पुढील तपास करीत आहेत. संशयित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांना अटक केल्यानंतर पुढील सखोल तपास केला जाईल, असेही भालचिम यांनी सांगितले. या घटनेत बाळासाहेब वाघमारे यांचा काही संबंध आहे की विनाकारण त्यांचे नाव घेण्यात आले आहे, याचाही तपास होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संशयित आरोपींनी 20 जुलैपासून आजपर्यंत धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला जाणार आहे.

'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी
दारुड्या बापानेच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

दोघांचे मोबाईल चोरट्याकडून लंपास

येथील लिमयेवाडी परिसरातील अनिल भीमराव शेळके, रघुनाथ शेषप्पा बंदीछोडे या दोघांच्या खिशातील मोबाईल चोरट्याने लंपास केल्याची घटना बाळे येथील ब्रीजजवळ घडली. बाळे ब्रीजजवळील चहाच्या गाड्याजवळ थांबल्यानंतर कोणीतरी चोरट्याने मोबाईल चोरल्याची फिर्याद विजय शिवाजी राक्षे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिस नाईक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

चोरट्याने शेतातील मोटार, केबल चोरले

कुमठे येथील अतुल भीमाशंकर जम्मा (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांच्या शेतातील बंद खोलीचा दरवाजा तोडून चोरट्याने त्यातील केबल वायर व मोटार असा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घडली, अशी फिर्याद अतुल जम्मा यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. पोलिस नाईक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

'एक कोटी द्या, नाहीतर..!' पुतण्याची चुलत्याला धमकी
सोलापूर जिल्ह्यात 40 हजार शेतकऱ्यांना कर्जच नाही

दोन गटात दगडफेक; 19 जणांविरुद्ध गुन्हा

शास्त्री नगरातील महादेव मंदिर व त्यानंतर कुर्बान हुसेन नगरातील झोपडपट्टी परिसरात एकमेकांविरुद्ध खुनशीने बघण्याच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून दगड, काठ्या व बांबू घेऊन मारामारी, दंगा करून दगडफे करण्यात आली, या कारणातून 19 जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार कृष्णात बडूरे यांनी फिर्याद दिली आहे.

दोन गटांतील हाणामारीत दोन रिक्षांचे नुकसान झाले आहे. या भांडणात सूरज गौतम कांबळे व विजय लक्ष्मण अण्णारेड्डी, जब्बार कोरबू हे जखमी झाले आहेत, असेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मझहर जब्बार कोरबू, जब्बार उस्मानसाब कोरबू, सोहेल शेख, अझहर जब्बार कोरबू, सलमान जैनुद्दीन नदाफ, वसीम ऊर्फ शमशोद्दीन काझी, रमजान ऊर्फ साहील मशाद शेख, ऐजाज आरिफ दंडू तर दुसऱ्या गटातील सूरज गौतम कांबळे, नागेश बाबू कांबळे, राहुल खाजप्पा अण्णारेड्डी, विजय लक्ष्मण अण्णारेड्डी, विजय साळवी व त्यांच्यासोबतीला असलेल्या पाच ते सहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com