
Pandharpur News
Sakal
पंढरपूर : साहेब...तुम्हीच माझे माय बाप आहात. मला कोणी तरी मदत करा हो.... अशी आर्त हाक धोंडेवाडी (ता.पंढरपूर) येथील एक वयोवृध्द अपंग महिला अनेकांना देत आहे. अनुसया किसन जाधव ( वय 80) असं या निराधार महिलेचे नाव आहे. डोक्यावरच्या गळक्या घरातच तीला सध्या मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.तिला मदतीची गरज आहे.