सांगलीचा नवरा अन्‌ कोल्हापूरची नवरी; धाक मात्र सोलापूरच्या जातपंचायतीचा!

सांगलीचा नवरा अन्‌ कोल्हापूरची नवरी; धाक मात्र सोलापूरच्या जातपंचायतीचा!
जातपंचायत
जातपंचायतCanva
Updated on
Summary

जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याप्रकरणी व परत समाजात घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली.

सोलापूर : जात पंचायतीने (Jaat Panchayat) समाजातून बहिष्कृत करून वाळीत टाकल्याप्रकरणी व परत समाजात घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर येथील गोंधळी समाजातील (Gondhali Community) चार पंचांना एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police, Solapur) अटक केली आहे. शरणीदास पांडुरंग भोसले (रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली) (Sangli) यांची कोल्हापूर (Kolhapur) येथील पत्नी नांदत नसल्याने झालेला वाद मिटवण्यासाठी या पंचांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत भोसले यांनी चार जातपंचाविरुद्ध तक्रार केली होती.

जातपंचायत
सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !

याबाबत अधिक माहिती अशी की, गोंधळी समाज हा पूर्वापार रुढी- परंपरांचे पालन करणारा भटका समाज आहे. सध्या मांगले (ता. शिराळा, जि. सांगली) येथे वास्तव्यास असलेल्या शरणीदास पांडुरंग भोसले (वय 40) यांचा विवाह कोल्हापूर येथील माया नावाच्या मुलीशी झाला होता. तीन अपत्ये झाल्यानंतर ती नांदायला येत नव्हती. यामुळे मागील अनेक दिवसांपासून या पती- पत्नीमध्ये वाद आहे. शरणीदास भोसले यांचे पूर्वज सोलापुरातील रविवार पेठ, जोशी गल्ली येथील असल्याने त्यांना सोलापूर येथील जात पंचायतीसमोर त्यांचे कौटुंबिक वाद मिटवावे लागत आहेत. शरणीदास भोसले यांची पत्नी कोल्हापूर येथील असून ते स्वत: सांगली जिल्ह्यात राहात आहेत. मात्र, अजूनही गोंधळी समाज जुन्या रुढी- परंपरेत अडकून पडलेला असल्यामुळे जात पंचायतीच्या सांगण्यावरून त्यांना 2018 पासून समाजाने वाळीत टाकले आहे. तेथील समाज त्यांना कोणत्याही कार्यक्रमांसाठी बोलावत नाही.

जातपंचायत
मोठ्या प्रतिसादामुळे किसान रेल्वे धावणार आता आठवड्यातील चार दिवस !

या प्रकरणी शरणीदास भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सोलापूर गोंधळी समाजाचे पंच राम धोंडिबा शिंदे- पाटील, अशोक शिंदे- पाटील, नाना शिंदे- पाटील,संतोष राम शिंदे- पाटील (सर्व रा. न्यू शिवाजी नगर, गोंधळी वस्ती, सोलापूर) यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माळी हे करीत आहेत.

सख्ख्या भावानेही येऊ दिले नाही घरी

शरणीदास भोसले यांची आई व भाऊ कोल्हापूर येथे राहतात. त्यांची आई काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार घेत होती. या वेळी आईला पाहण्यासाठी शरणीदास यांनी कोल्हापूरला येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांचा सख्खा भाऊही म्हणाला, जात पंचायतीला तू माझ्या घरी आल्याचे समजले तर ते मलाही वाळीत टाकतील, त्यापेक्षा तू आईला पाहायला येऊच नकोस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Marathi News Esakal
www.esakal.com