दुचाकी व मालट्रक अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी व मुलगी जखमी

दुचाकी व मालट्रक अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी व मुलगी जखमी
Accident
AccidentSakal
Updated on: 
Summary

ही घटना खवणी (ता. मोहोळ) गावच्या शिवारात रविवारी (ता. 24) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.

मोहोळ (सोलापूर) : आजारी असलेल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबाला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीवरील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी व एक वर्षाची मुलगी जखमी झाली. ही घटना खवणी (ता. मोहोळ) (Mohol Taluka) गावच्या शिवारात रविवारी (ता. 24) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.

Accident
आजपासून 'एसटी' प्रवास महागणार! डिझेल दरवाढीचा परिणाम

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल गोरख गोसावी (वय 30, रा. धर्मपुरी, नातेपुते, ता. माळशिरस) हे आपल्या दुचाकी (क्रमांक एमएच 45- एए 3160) वरून पत्नी लक्ष्मी व एक वर्ष वयाची मुलगी आराध्या असे तिघे जण रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील नातेवाईक आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी निघाले होते. नातेपुते, पंढरपूर मोहोळ मार्गे ते जात असताना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खवणी गावच्या शिवारात सुर्वे वस्तीसमोर ते आले असता मोहोळकडून पंढरपूरकडे एमएच 20 - डीटी 0161 या भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अमोल गोसावी हे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी लक्ष्मी व मुलगी आराध्या असे दोघेही जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचार सुरू असताना अमोल गोसावी यांचा सोमवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता मृत्यू झाला.

Accident
कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

या प्रकरणी दुचाकीवरील अमोल गोसावी यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालट्रक चालकाविरोधात मोहोळ पोलिसात सोमवारी (ता. 25) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com