कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना

कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना
कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना
कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटनाSakal
Updated on: 
Summary

समोरून निघालेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव जाणारी एसटी त्यावर आदळून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.

मोहोळ ( सोलापूर) : समोरून निघालेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने भरधाव जाणारी एसटी त्यावर आदळून झालेल्या अपघातात (Accident) आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur- Pune National Highway) चिखली शिवारात सोमवारी (ता. 25) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झाला. सर्व जखमींवर मोहोळ (Mohol) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना
दिलासादायक! ऐन हिवाळ्यात सुका मेवा झाला स्वस्त

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस (क्रमांक एमएच 20 बीएल 3878) ही पुण्याहून उमरगाकडे निघाली होती. ती चिखली शिवारात येताच तिच्या समोरून कंटेनर चालला होता. कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्याने एसटीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात नामदेव शंकर येवले (वय 40, रा. तेलवाड, ता. निलंगा), नामदेव मनोहर कांबळे (वय 31, रा. माडज, ता. उमरगा), प्रभाकर पंडित बिराजदार (वय 21, रा. कासार सिरशी), प्रवीण प्रल्हाद ननवरे (वय 30, रा. सोलापूर), सारिका प्रवीण ननवरे (वय 28, रा. सोलापूर), समाधान उत्तम वाघमारे (वय 35, रा. उंबरे), काशिनाथ शिवलिंग आरबाळे (वय 65, रा कासार सिरशी), योगेश बसवराज दुधाळे (वय 18, रा सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

कंटेनर व बसच्या अपघातात आठ जखमी! सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना
मायक्रो फायनान्स कंपनीची फसवणूक! कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

अपघात होताच कंटेनर न थांबता पुढे निघून गेला. मात्र एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ येथील वाहतूक नियंत्रक विलास देसाई यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com