कर्नाटकातील तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातील 32 वर्षीय पुरुषाचे गुप्तांग कापले! तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
कर्नाटकातील तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

कर्नाटकातील तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे पोलिसांच्या ताब्यात

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील गुरववाडी व कडबगाव रस्त्यावर 32 वर्षीय पुरुषास मारहाण (Crime) करून धारदार ब्लेडने गुप्तांग कापण्यात आले. या घटनेमुळे तो गंभीर जखमी झाला असून, सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital) त्याच्यावर उपचार चालू आहेत. याची दक्षिण पोलिस (Akkalkot Police) ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे. या घटनेतील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: ...अन्यथा 'सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकामाला दोन महिन्यांची मुदत!

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिबूब सैपन कलबुर्गी (वय 32, रा. तडवळगा, ता. इंडी, जि. विजयपूर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. 18) सकाळी उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 17) सायंकाळी सात वाजता विजयपूरहुन मुन्ना चांदसाब पटेल, अब्दुल हमीदनजीर मुल्ला हे दोघे मिळून मोटारसायकलीने फिर्यादी महिबूब सैपनसाब कलबुर्गी याच्या घराजवळ गेले व फिर्यादीस जेवणासाठी धाब्यावर चल म्हणून मणूर गावाजवळ आणले. त्या ठिकाणी हुसेन नबीलाल तोडंगी (रा. करजगी, ता. अक्कलकोट) हा तिसरा मित्र मणूर येथे आला.

हे तिघे मिळून फिर्यादीस कडबगाव (ता. अक्कलकोट) जवळ मित्राची गाडी खराब झाली आहे, असे सांगून आणले. फिर्यादी महिबूब कलबुर्गी यास अज्ञात कारणाने वरील तिघांनी शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली व ठार मारण्याचा उद्देशाने डोक्‍यात बिअरच्या बाटलीने मारले. तसेच महिबूबच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. यानंतर संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा: रवींद्र खंदारे करणार 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

गुप्तांग कापल्याने महिबूब बेशुद्ध पडला. गुरुवारी (ता. 18) तो शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्याच्या मोबाईलवरून नातेवाइकांना कळवले. यानंतर नातेवाईक व पोलिस घटनास्थळी पोचले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक छबू बेरड हे करीत आहेत.

loading image
go to top