
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार ठरलेल्या ३५ जणांकडून २३८ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. यासाठी संबंधित संचालक, माजी अधिकारी व माजी कर्मचारी यांना १० नोव्हेंबरला वसुलीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळण्यास सुरवात झाली आहे. २७ नोव्हेंबरपासून वसुलीच्या नव्या टप्प्याला सुरवात होण्याची शक्यता आहे.