दोन डोस ठरले सुरक्षाकवच ! पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू

दोन डोस ठरले सुरक्षाकवच ! पहिला डोस घेतलेल्या दोघांचा मृत्यू
 corona vaccination
corona vaccinationEsakal
Updated on

कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतल्यानंतरही शहर- ग्रामीणमधील 11 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. एक डोस घेतल्यानंतर काहींना कोरोना झाला.

सोलापूर : कोरोनावरील (Covid-19) प्रतिबंधित लस (Covid Vaccine) घेतल्यानंतरही शहर- ग्रामीणमधील 11 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. एक डोस घेतल्यानंतर काहींना कोरोना झाला. एक डोस घेऊन कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, कोविडचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या 11 रुग्णांनी सहजपणे कोरोनावर मात केली आहे. दोन्ही डोस झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने हे "दोन डोस' जणू सर्वांचे सुरक्षाकवच ठरले आहेत. (A patient taking two doses of corona vaccine can easily recover from the illness-ssd73)

 corona vaccination
दिवसात "उजनी'त 10 टक्‍के पाणी! 60 टक्‍क्‍यांनंतरच उघडणार दरवाजे

सोलापूर जिल्ह्यातील 35 लाख 78 हजार 32 व्यक्‍तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात 42 हजार 49 आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइनवरील 77 हजार 468 तर 45 ते 59 वयोगटातील नऊ लाख 66 हजार 997 व्यक्‍तींचा समावेश आहे. तसेच 60 वर्षांवरील पावणेपाच लाख आणि 18 ते 44 वयोगटातील 21 लाख 35 हजार 471 तरुणांचाही समावेश आहे. आतापर्यंत सहा लाख 65 हजार व्यक्‍तींना पहिला डोस टोचण्यात (Vaccination) आला आहे. त्यापैकी दोन लाख सात हजार व्यक्‍तींनी दोन्ही डोस टोचून घेतले आहेत. शहरातील दोन लाख 15 हजार जणांनी पहिला डोस घेतला असून त्यातील 62 हजार लोकांनी दुसराही डोस टोचला आहे. तसेच ग्रामीण भागातील दोन्ही डोस घेतलेले एक लाख 45 हजार व्यक्‍ती कोरोनापासून सुरक्षित झाल्याचा विश्‍वास आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे. दरम्यान, लस घेतल्यानंतर कोरोना तथा काहीच होत नाही, हा भ्रम नागरिकांनी ठेवू नये. लस घेतल्यानंतरही सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने (Department of Health) केले आहे.

प्रतिबंधित लस घेतल्याने शरीरात रोगप्रतिकारकशक्‍ती निर्माण होते. त्यामुळे पुन्हा बाधित झाल्यानंतर तो रुग्ण फारसा गंभीर होत नाही. त्यामुळे तो सहजपणे बरा होऊ शकतो. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनंतर तर कोवॅक्‍सिनचा 28 दिवसांनतर घ्यावा. दुसऱ्या डोसमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्‍तीला आणखी चालना मिळते.

- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

 corona vaccination
युवकाचं मुख्यमंत्र्यांना ट्‌वीट! वाचले महापुरातील पंधराजणांचे प्राण

दोन डोस घेऊनही 11 जण पॉझिटिव्ह

ऑगस्टमध्ये जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात लस मिळेल. पुढील तीन महिन्यांत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वच व्यक्‍तींचे (35.78 लाख व्यक्‍ती) लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तत्पूर्वी, कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही. परंतु, ज्या व्यक्‍तीने दोन्ही डोस घेतले आहेत, त्याच्या शरीरात कोरोनाला हरविण्याएवढी रोगप्रतिकारकशक्‍ती तयार होते. त्यामुळे जिल्ह्यातील 11 रुग्णांना दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना होऊनही ते सहजपणे बरे झाले, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दोन्ही डोसचे फायदे

  • कोरोना झाल्यानंतर रुग्ण गंभीर होण्याची शक्‍यता कमीच

  • लस घेतल्यानंतर कोरोना झालेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची फारशी गरज पडत नाही

  • को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) असो वा ज्येष्ठ नागरिकांमध्ये तयार होते रोगप्रतिकारक शक्‍ती

  • लसीचे दोन्ही डोस घेतलेला रुग्ण मध्यम तथा तीव्र होत नाही, तो रुग्ण सहजपणे लवकर बरा होतो

"सिव्हिल'मध्ये चौघांना कॉकटेल इंजेक्‍शन

कोरोनासाठी प्रतिकारक ठरलेल्या दोन अँटीबॉडीजच्या (टॅसिलिझुमाब आणि इम्डेविमॅब) दोन्ही औषधांचे मिश्रण तथा कॉकटेल करून इंजेक्‍शन तयार केले आहे. या इंजेक्‍शनमुळे उपचारासाठी कमी वेळ लागतो तसेच रुग्णाचा त्रास कमी होऊन तो लवकर बरा होतो. हे इंजेक्‍शन पहिल्या सात दिवसात दिले जाते. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णास हे इंजेक्‍शन दिले जाते. या इंजेक्‍शनची अंदाजित किंमत 70 हजार रुपये आहे. सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) सध्या दोनशे इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. आतापर्यंत चार रुग्णांसाठी या इंजेक्‍शनचा वापर करण्यात आला असून ते सर्वजण सुखरूप बरे होऊन घरी परतले आहेत. चारही रुग्णांना मोफत इंजेक्‍शन दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com