esakal | माढा सबजेलमधून फरार दुसरा कैदीही कुर्डुवाडीमधून ताब्यात ! कुर्डुवाडी पोलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

माढा सबजेलमधून फरार दुसरा कैदीही कुर्डुवाडीमधून ताब्यात !

माढा सबजेलमधून फरार दुसरा कैदीही कुर्डुवाडीमधून ताब्यात !

sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

माढा सबजेलमधून चौघा कैद्यांनी पोलिसाला धक्काबुक्की करून सबजेलमधून पळ काढला होता.

कुर्डुवाडी (सोलापूर) : माढा सबजेलमधून सोमवारी पळालेल्या चार कैद्यांपैकी एकास कुर्डुवाडी रेल्वे स्थानक (Kurduwadi railway station) परिसरात मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे (Police Inspector Chimanaji Kendre) व त्यांच्या पथकाने पकडले. तानाजी नागनाथ लोकरे (रा. लऊळ, ता. माढा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (A prisoner who escaped from Madha sub-jail was caught in Kurduwadi-ssd73)

हेही वाचा: अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

माढा सबजेलमधून सिद्धेश्वर शिवाजी केचे (रा. दारफळ, ता. माढा), आकाश ऊर्फ अक्षय रॉकी भालेकर (रा. डिडुळगाव, जि. पुणे), तानाजी नागनाथ लोकरे (रा. लऊळ, ता. माढा), अकबर सिद्धाप्पा पवार (रा. कुर्डू, ता. माढा) या चौघा कैद्यांनी पोलिसाला धक्काबुक्की करून सबजेलमधून पळ काढला होता. पोलिस त्यांचा शोध घेत होते. त्यापैकी आकाश भालेकर यास माढा पोलिसांनी सोमवारीच निमगाव शिवारात पकडले होते.

हेही वाचा: सीईटीची चिंता नको, सर्वांनाच मिळणार अकरावीला प्रवेश !

श्री. केंद्रे यांना खबऱ्याकडून पळालेल्यांपैकी पोक्‍सोखालील संशयित आरोपी तानाजी लोकरे हा कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून रेल्वेने पुण्याला जाणार असल्याची माहिती मिळाली. श्री. केंद्रे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन गोरे, दत्ता सोमवाड, सिद्धनाथ वल्टे यांनी सापळा रचून त्याला पकडले. अजून कैद्यांचा सुगावा पोलिसांना लागला नाही, मात्र त्यांचाही शोध पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.

loading image