esakal | अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात
sakal

बोलून बातमी शोधा

अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीतून जखमींना पाठविले रुग्णालयात

sakal_logo
By
सूर्यकांत बनकर

मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर मोटारसायकलवरून दोन व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले.

करकंब (सोलापूर) : पंढरपूर-टेंभुर्णी रोडवर आजोती हद्दीत झालेल्या दुचाकीवरील अपघात ग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनातून तातडीने दवाखान्यात नेऊन वेळेवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली. सोमवारी रात्री साडेआठ वाजणेचे सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त विठुरायाच्या महापूजेसाठी टेंभुर्णीहून पंढरपूरला जात असतानाच तालुक्यायील आजोती पाटीजवळ एक दुचाकी स्लिप होऊन त्यावरील दोघेजण जखमी होऊन खाली पडले होते. (The injured were rushed to the hospital in a vehicle belonging to the Chief Minister's convoy-ssd73)

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची सपत्नीक महापूजा!

ही बाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्वात पुढे असणाऱ्या पोलीसांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करताच ताफ्यातील सर्वच गाड्यांचा वेग मंदावला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेऊन लगेच अपघात ग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांच्या ताफ्यातील वाहनातूनच दोन्ही अपघातग्रस्तांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ताफ्यातील गाडीतून जखमींना पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवाय संतोष दुर्योधन भोंगळे (भाऊ), कैलास वाखुरे (मित्र) यांना त्यांच्या फोनवर घटनेची माहिती देण्याचे काम पोलिसांनी केले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर आहे. पंढरपुरात गेल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी व जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (District Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी अपघात ग्रस्तांचे पुढे काय झाले म्हणून चौकशी केली असता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कळल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

loading image