मोहोळ येथील महालोक अदालतीत विक्रमी साडेतीन कोटींची वसुली !

मोहोळ येथील महालोक अदालतीत विक्रमी साडेतीन कोटींची वसुली !
महालोक अदालत
महालोक अदालतCanva
Summary

मोहोळ येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीने महा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

मोहोळ (सोलापूर) : सध्या कोरोनाची (Covid_19) महामारी सुरू आहे. शासनाने सुरू केलेल्या या महालोक अदालती (Maha Lok Adalat) सारख्या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपापसातील कटुता टाळावी. जास्तीत जास्त खटले निकाली काढावेत, असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर. एन. गायकवाड (Civil Judge R. N. Gaikwad) यांनी केले. मोहोळ येथील तालुका विधी सेवा समितीच्या (Mohol Taluka Legal Services Committee) वतीने महा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्‌घाटन प्रसंगी न्यायाधीश गायकवाड बोलत होते. या महालोक अदालतीच्या माध्यमातून 248 खटले तडजोडीने मिटविण्यात आले. त्या माध्यमातून 3 कोटी 33 लाख 66 हजार 726 रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली.

महालोक अदालत
रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडला !

या वेळी सह न्यायाधीश पी. आर. कुलकर्णी, पोलिस निरीक्षक अशोक सायकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने, ऍड. एस. डी. पवार, व्ही. टी. धावणे, एस. बी. कुलकर्णी, सहाय्यक अधीक्षक संतोष कुलकर्णी, दुसरे सहाय्यक अधीक्षक नजीर बागायत, न्यायालय लिपिक शिवकुमार आलूर आदींसह पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी 248 खटले तडजोडीने मिटविण्यात आले. त्यातून 3 कोटी 33 लाख 66 हजार 726 रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली. पॅनेल प्रमुख म्हणून न्यायाधीश गायकवाड व न्यायाधीश कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर सदस्य म्हणून ऍड. एम. आर. भालेराव, तानाजी शिंदे, एस. आर. इवरे, आर. बी. शिंदे यांनी काम पाहिले.

महालोक अदालत
अबब, खिलार बैलाची सहा लाखांना विक्री! करणार माउलींच्या रथाचे सारथ्य

या महालोक अदालतीत तडजोडीसाठी 1197 खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, त्यापैकी 137 खटले तडजोडीने मिटविण्यात आले. त्या माध्यमातून दोन कोटी 23 लाख 74 हजार 788 रुपये वसुली करण्यात आली. पंचायत समिती, विविध बॅंका व पतसंस्था यांची दाखल पूर्व 1410 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 111 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. त्या माध्यमातून एक कोटी नऊ लाख 91 हजार 938 रुपयांची वसुली करण्यात आली. पर्यावरणाचा संदेश देत या वेळी मान्यवरांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com