अबब, खिलार बैलाची सहा लाखांना विक्री! करणार माउलींच्या रथाचे सारथ्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अबब, खिलार बैलाची सहा लाखांना विक्री! करणार माउलींच्या रथाचे सारथ्य

मंगळवेढा तालुक्‍यातील हिवरगाव येथील सतीश होनराव या शेतकऱ्यालाही गाई व बैलांचे संगोपन करण्याचा छंद आहे.

अबब, खिलार बैलाची सहा लाखांना विक्री! करणार माउलींच्या रथाचे सारथ्य

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्‍यातील हिवरगाव (Hivargaon) येथील सतीश होनराव या शेतकऱ्याने उत्कृष्ट पद्धतीने संगोपन केलेल्या खिलार जातीच्या बैलाला (Bull) तब्बल सहा लाख 11 हजार रुपये किंमत मिळाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Saint Dnyaneshwar Maharaj) सोहळ्याच्या रथाचे सारथ्य करण्यासाठी सागर टिळेकर (रा. धायरी, पुणे) यांनी या बैलाची खरेदी केली आहे.

हेही वाचा: बिबट्याच्या शोधासाठी पाणवठ्यांवर कॅमेरे ! रात्रभर गस्त सुरू

या वेळी आमदार समाधान आवताडे (MLA Samadhan Avtade), माजी सभापती प्रदीप खांडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक विजय रणदिवे, रामचंद्र होनराव, आण्णासाहेब होनराव, शंकर संघशेट्टी, इरगोंडा पाटील आदी उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्‍याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे प्रभावी साधन नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी शेतीपूरक दूध व्यवसाय निवडला आहे. यातून रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. त्यामुळे गावरान जनावरांऐवजी दूध देणाऱ्या जर्शी गायी घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. काही शेतकरी खिलार जातीच्या गाईंचाही सांभाळ करत आहेत. जर्शी गायीच्या दुधाच्या विक्रीतून कौटुंबिक स्थैर्य निर्माण होत आहे.

हेही वाचा: शहरात 157 जण डेंग्यू पॉझिटिव्ह ! पाण्याचा साठा कारणीभूत

मंगळवेढा तालुक्‍यातील हिवरगाव येथील सतीश होनराव या शेतकऱ्यालाही गाई व बैलांचे संगोपन करण्याचा छंद आहे. त्यासाठी त्यांनी राज्याबरोबरच परराज्यात भरवल्या जाणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शनांना भेटी दिल्या. या भेटीतूनच घटप्रभा (ता. रायबाग, गोकाक) येथील जनावरांच्या प्रदर्शनातून खिलार जातीचा बैल दोन लाख रुपये किमतीला दीड वर्षापूर्वी त्यांनी आणला होता. या बैलापासून नवीन उत्पत्ती चांगली होण्यासाठी सोलापूर, सांगली, सातारा येथून देशी गायी हिवरगाव येथे आणल्या जात होत्या. तसेच या खिलार जातीच्या बैलाची माहिती सोशल मीडियातून राज्यभर पोचली होती. त्यानंतर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाचे सारथ्य करण्यासाठी या बैलाची मागणी करण्यात आली व होनराव यांनी बैलाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक कार्यासाठी हा बैल दिला जात असल्याने त्याची तब्बल सहा लाख 11 हजार रुपयांना विक्री करण्यात आली.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पोटाला चिमटा देऊन जनावरांचे संगोपन केलेले असते. होनराव यांनीही त्यांच्या बैलाचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले आहे. या बैलाची महती सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोचली आहे. त्यामुळेच या बैलाला चांगला दर मिळाला. यावरून दुष्काळी तालुक्‍यात देखील जनावरांच्या माध्यमातून चांगली आर्थिक उलाढाल होऊ शकते, हे हिवरगाव येथील होनराव यांनी दाखवून दिले आहे. इतर शेतकऱ्यांसाठी हे आदर्श उदाहरण आहे.

- समाधान आवताडे, आमदार, पंढरपूर-मंगळवेढा

Web Title: Khilar Bull From Hivargaon Were Sold For Rs 6 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top