सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद
सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद

सोशल मीडियावर चुकीचे काही टाकू नका! सोलापुरातील युवक जेरबंद

सोलापूर : त्रिपुरातील (Tripura) घटनेच्या पार्श्‍वभूमीवर दोन समाजात तथा धर्मांत तेढ निर्माण होईल, असा कोणताही आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) टाकू नये, असे आवाहन पोलिस आयुक्‍त हरीश बैजल (Commissioner of Police Harish Baijal) यांनी केले आहे. कठोर कारवाईचा इशारा देऊनही शहरातील सलीम शेख (कुमठे) याने मारहाणीचा जुना व्हिडिओ व्हायरला केला. या प्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील (Kamlakar Patil) यांनी दिली.

हेही वाचा: सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित

त्रिपुरात प्रत्यक्षात घटना घडली की नाही, याची खातरजमा न करताच महाराष्ट्रात दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अमरावतीत झाला. त्यानंतर गृह विभागाने सायबर सेलला अलर्ट केले आहे. दुसरीकडे, शहर- ग्रामीणमधील सर्व पोलिस प्रमुखांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जात आहे. विनाकारण कोणीही दोन समाजात अथवा धर्मांमध्ये संघर्ष निर्माण होईल, तेढ निर्माण होईल असे वक्‍तव्य, मेसेज किंवा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम यासह इतर सोशल मीडियावर टाकणार नाही, याची दक्षता सायबर सेलच्या माध्यमातून घेतली जात आहे. तसा मेसेज अथवा व्हिडिओ तत्काळ डिलीट केला जात आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पोलिस आयुक्‍त बैजल यांनी नागरिकांना आवाहन करत, कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, तरीही एका तरुणाने आज तो व्हिडिओ व्हायरल केला. खूप वर्षांपूर्वीचा तो व्हिडिओ असून, पश्‍चिम बंगालमधील तो असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. अशा प्रकारचे जुने व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा: बोकडांच्या मदतीने वीजनिर्मिती! दोन चिमुकल्यांचा आविष्कार

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील म्हणाले...

  • दोन धर्मांमध्ये विनाकारण तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह कोणतीच गोष्ट सोशल मीडियावर टाकू नये

  • सोशल मीडियावर सायबर सेलचा वॉच; तेढ निर्माण करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

  • शहरातील एका युवकाला सदर बझार पोलिसांनी केली अटक; सोशल मीडियावर टाकला होता व्हिडिओ

  • पश्‍चिम बंगालमधील जुना व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्या तरुणावर आरोप

loading image
go to top