सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित
सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित

सोलापूर एसटी विभागाला पाच कोटींचा फटका! 40 कर्मचारी निलंबित

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (Maharashtra State Transport Corporation) सोलापूर (Solapur) विभागाला मागील सात दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Strike) जवळपास पाच कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सोलापूर विभागात एकूण 4 हजार 500 कर्मचाऱ्यांपैकी 40 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे. त्यामुळे सोलापूर विभागातील 9 आगारातून मागील सात दिवसांपासून एकही बस सुटली नाही.

हेही वाचा: 'विरोधकांची दुटप्पी भूमिका ST कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हानीकारक!'

या कालावधीत नऊ आगारातील बसेस जागेवरच असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सुरवातीला सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी या संपाला पाठिंबा दिला नव्हता. मात्र, मागील रविवारपासून (ता. 7) सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये जिल्ह्यातील 9 आगारांतील 4 हजार 200 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मागील सात दिवसांपासून सोलापूर विभागातील 690 बसेस त्या-त्या आगारात उभ्या आहेत. एसटी महामंडळाला जवळपास सर्वच फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सोलापूर विभागाला दररोज जवळपास 60 लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मागील सात दिवसांत महामंडळाला जवळपास पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

माल वाहतुकीचेही लाखोंचे नुकसान

सोलापूर विभागातील माल वाहतूक करण्यासाठी 30 गाड्या आहेत. सध्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे माल वाहतुकीतून मिळणारे दररोजचे लाखो रुपयांचे उत्पन्नही ठप्प झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे.

मागील सात दिवसांपासून सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने शासनाचा निषेध करीत आहेत. दुसरीकडे, मात्र कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घ्यावे यासाठी शासनाकडून दबाव टाकण्यात येत आहे. शासनाने आंदोलन करणाऱ्या जवळपास 40 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हजर राहावे, त्यानंतर निलंबन मागे घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यास नकार दिला असून, जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: ...मात्र कंगनाच्या वक्तव्याचा निषेध : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे

आकडे बोलतात...

  • एकूण बस : 690

  • एकूण कर्मचारी : 4 हजार 500

  • एकूण आगार : 9

  • माल वाहतूक बस : 30

  • आर्थिक नुकसान : 5 कोटी

loading image
go to top