सिध्देवाडीत तरुणाची आत्महत्या; अद्यापही कारण अस्पष्ट

सिध्देवाडीत तरुणाची आत्महत्या; अद्यापही कारण अस्पष्ट
Updated on
Summary

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : अज्ञात कारणावरून एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सिध्देवाडी (ता. पंढरपूर) येथे सोमवारी (ता.6) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. (a youth has committed suicide in siddhewadi village)

सिध्देवाडीत तरुणाची आत्महत्या; अद्यापही कारण अस्पष्ट
महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाखांचा गांजा

संदीप राजाराम ननवरे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून आई वडिलांनी संदीपचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सध्या तो ग्राफिक्स आणि डिझाईन क्षेत्रात काम करत होता. आई वडिलांना एकुलता एक असलेल्या संदीपने कोणत्या तरी नैराश्येतून आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत. (a youth has committed suicide in siddhewadi village)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Ganesh Mandal News
Pune Teachers Constituency
Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Marathi News Esakal
www.esakal.com