
आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे बंद असलेल्या या साखर कारखान्यात योग्य नियोजन करून दोन महिन्यात साखर कारखाना सुरू करत 24 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले.
मंगळवेढा - तालुक्यातील नंदुरच्या आवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रा. लि. या खासगी साखर कारखान्याने 2350 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून खासगी कारखानदारीत जिल्ह्यातील सर्वाधिक दर दिला.
आ. समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे बंद असलेल्या या साखर कारखान्यात योग्य नियोजन करून दोन महिन्यात साखर कारखाना सुरू करत 24 दिवसात एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर हा कारखाना देईल. असा दिलेला शब्द पाळत सर्व जातीच्या उसाला समान 2350 रुपयाची उचल जाहीर केली असून, सोमवारपासून शेतकऱ्यांना बँकेतून पैसे मिळणार आहे. याबाबत माहिती अध्यक्ष संजय आवताडे यांनी दिली.
यावेळी आवताडे म्हणाले कि आवताडे शुगर सर्वाधिक दर देणार असा विश्वास आमच्या परस्पर शेतकऱ्यांना सुद्धा होता आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू केला असून आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मादास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, वाहन मालक, वाहन चालक, कारखान्याचे शेतकी अधिकारी ऊसतोड कामगार झटत असून या सर्वांचे मोलाचे योगदान असून उसाची रिकव्हरी अजून चांगली वाढली तर अजून चांगला दर देण्यात येईल असे अध्यक्ष आवताडे यांनी बोलून दाखविले.
आवताडे शुगर ने उसाच्या जातीत एकदुसरेपणा न करता सर्व जातीला एकसमान दर दिल्याने आम्ही या दरावर समाधानी आहे.
- अनिल बिराजदार, स्वाभीमानी शेतकरी संघटना
या शाखेतून मिळणार शेतकऱ्यांना बिल
बबनराव आवताडे पतसंस्था
शाखा मंगळवेढा -
मंगळवेढा, कचरेवाडी, घरनिकी, धर्मगाव, खडकी, मल्लेवाडी, घाटोळे वस्ती, खोमनाळ, चिक्कलगी, शिरनांदगी
बबनराव आवताडे पतसंस्था
शाखा मरवडे - मरवडे, येड्राव, निंबोणी, हुलजंती, माळेवाडी, तळसंगी, भाळवणी, डोणज, नंदुर, बालाजीनगर, कात्राळ,कर्जाळ,कागष्ट
बबनराव आवताडे पतसंस्था
शाखा माचनूर - माचनूर, ब्रह्मपुरी, मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, अर्धनारी, सोहाळे, कोथाळे, इचगाव, येणकी, मिरी, अरबळी, वटवटे, वडदेगाव, नळी, आंबेचिंचोली.
राजमाता अर्बन बँक -
शाखा मंगळवेढा - बठाण, उचेठाण, ढवळस, गुंजेगाव (मं.), महमदाबाद (शे), लक्ष्मी दहिवडी, मुढवी.
यशोदा महिला पतसंस्था मंगळवेढा -
अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, शरदनगर (ढेकळेवाडी), नंदेश्वर, मारापुर.
जनकल्याण मल्टीस्टेट पंढरपूर -
तावशी, ओझेवाडी, सरकोली, आंबे, रांझणी, भोसे (क), तारापूर.
जनकल्याण शाखा बेगमपूर -
बेगमपूर, पुळुज, पुळुजवाडी, औंढी, पाटकुल, टाकळी सिकंदर.
जनकल्याण भंडारकवठे -
भंडारकवठे, तेलगाव, कुसुर, निंंबर्गी.
जनकल्याण धुळखेड -
धुळखेड, तद्देवाडी, हवीनाळ, गुंदवान, चणेगाव, टाकळी उमराणी, शिरगुर, शिरनाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.