मोठ्या थकबाकीदारांसाठी 133 कोटींची अभय योजना ! दहा लाखांवरील थकबाकीदारांची महापालिका आयुक्‍तांनी बनविली यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur-news-mahanagarpalika-696x364.jpg

ठळक बाबी... 

  • प्रत्येकी दोन हजार मालमत्तेसाठी नेमला एक वसुली लिपिक 
  • दहा हजार मिळकतीसाठी कर निरीक्षक नियुक्‍ती; वसुलीसाठी 104 कर्मचारी 
  • हद्दवाढ, गवसू, आणि शहर या तीन विभागाची पुनर्रचना करुन आता 20 युनिट तयार केले 
  • दहा लाखांवरील थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करुन आयुक्‍तांनी दिली कारवाईची नोटीस 
  • 53 बड्या थकबाकीदारांची पार पडली सुनावणी; 15 दिवसांत पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई 

मोठ्या थकबाकीदारांसाठी 133 कोटींची अभय योजना ! दहा लाखांवरील थकबाकीदारांची महापालिका आयुक्‍तांनी बनविली यादी

सोलापूर : शहरातील बड्या थकबाकीदारांसह बोगस नळ कनेक्‍शन, वेळेत कर न भरणाऱ्यांना केलेला दंड, नोटीस व वॉरंटी फी न दिल्याने त्यांना महापालिकेने 132 कोटी 59 लाख रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, दंड तर सोडाच कराची मूळ रक्‍कमही न भरणाऱ्यांना आता महापालिकेने तेवढ्याच रकमेचे "अभय' दिले आहे. त्यानुसार नोव्हेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांचा 80 टक्‍के दंड माफ केला जाणार आहे. तर डिसेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना 70 टक्‍के, जानेवारीपर्यंत 60 टक्‍के आणि फेब्रुवारी- मार्चपर्यंत कराची रक्‍कम भरणाऱ्यांना 50 टक्‍के दंड माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


ठळक बाबी... 

  • प्रत्येकी दोन हजार मालमत्तेसाठी नेमला एक वसुली लिपिक 
  • दहा हजार मिळकतीसाठी कर निरीक्षक नियुक्‍ती; वसुलीसाठी 104 कर्मचारी 
  • हद्दवाढ, गवसू, आणि शहर या तीन विभागाची पुनर्रचना करुन आता 20 युनिट तयार केले 
  • दहा लाखांवरील थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करुन आयुक्‍तांनी दिली कारवाईची नोटीस 
  • 53 बड्या थकबाकीदारांची पार पडली सुनावणी; 15 दिवसांत पैसे न भरल्यास जप्तीची कारवाई 


महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी पाचशे ते साडेसहाशे कोटींचा महसूल जमा होईल, असे उद्दिष्टे ठेवूनही मागील तीन वर्षांत तब्बल एक हजार कोटींची तूट आली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम झाला असून आर्थिक अडचणीमुळे नियमित कर भरणाऱ्यांना सोयी- सुविधाही देणेही मुश्‍किल झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता आयुक्‍तांनी दहा लाखांवरील थकबाकीदारांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात महापालिकेचे आजी- माजी पदाधिकारीही असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे. दुसरीकडे बोगस नळ कनेक्‍शन घेणाऱ्यांचाही शोध सुरु झाला आहे. मात्र, नियमित कर भरणाऱ्यांनी त्यांच्याकडील येणेबाकी भरली. परंतु, महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांनाच अभय दिले असून नियमित कर भरणाऱ्यांसाठीही स्वतंत्र सवलत योजना जाहीर करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. 


वेळेत कर न भरल्यास जप्तीची कारवाई
शहरातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणावर कराची थकबाकी झाली आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदारांनी कर भरणे अपेक्षित आहे. शहरातील 53 मोठ्या थकबाकीदारांची सुनावणी घेतली असून त्यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी वेळेत कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल. 
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्‍त, सोलापूर 


यांच्याकडे आहे मोठी थकबाकी 
कै. सुशिलाताई गायकवाड बहुद्देशीय संस्था, इसरातबी मौलाना रामपुरे, लक्ष्मी कुमार करजगी, रजनीबाई आनंद आळंदकर, सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ, प्रभात विभुते जी.टी.एल टॉवर, प्रकाश कृष्णात पाटील व इतर, प्राचार्य महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र, गौरीशंकर सिद्रामप्पा जक्‍कापुरे व इतर, मल्लवाबाई वल्याळ मेमोरियल चरिटेबल हॉस्पिटल, गणेश रामचंद्र आपटे व इतर एक, गुरुकृपा डेव्ह. बंडोपंत चव्हाण व इतर, म.बेगम कनरुनिस्सा कारागीर स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामसंघ भूमापक तहसिलदार, सोमवंशीय सहस्त्रार्जुन ट्रेनिंग नगर, सोमवंशीय सहस्त्रार्जुन राजयोग फॉरेस्ट, सोलर बीजी फॉर्मस प्रा.लि., श्री सिध्देश्‍वर साखर कारखाना, गुराप्पा हिराजीराव देशमुख, शशिकांत यल्लप्पा जाधव, भो. विजय बलभिम जाधव, मधुकर शंकर जमादार, रुक्‍मिणीबाई शामराव काटकर व इतर, मे.सुप्रीटेंड ऑफ मार्केट ऍण्ड शॉप, संभाजीराव शिंदे विद्यामंदिर, उमा गृहनिर्माण संस्था लि., द. मॅनेजर नरसिंग गिरजी मिल चाळ, भो-राजन कांतीलाल गांधी, कैलास दिगंबर अवसकर, सोमशंकर मल्लिकार्जुन देशमुख, अनिरुध्द ज्ञानेश्‍वर निरगुडे, महाराष्ट्र बॅंक, रविकांत शंकरप्पा पाटील, एक्‍झुक्‍युटिव्ह इंजिनिअर भीमा विकास, गर्व्ह.महा.मंत्री चंडक आयकॉन, सो.डिस्टी.मुलकी नोकर सोसायटी महात्मा फुले, सदाकत म.हुसेन बेसकर जीटीएल टॉवर, म.गणेश रामचंद्र आपटे इन्फ्रास्ट्रक्‍चर, चे.गुरुनानक चॅरिटेबल ट्रस्ट,जीटीएल टॉवर, कटारे स्पिनिंग मिल.टी.टी. कटारे व इतर, गणेश राचप्पा बाली, उमा गृहनिर्माण संस्था, सुनिल मंत्री रियालिटी, गर्व्ह.महा. मंत्री चंडक तडवळकर जिम, गर्व्ह. महा. मंत्री चंडक, बजाज फायनान्स यांच्याकडे थकबाकी मोठी आहे. त्यांची आयुक्‍तांनी सुनावणी घेतली असून त्यांना नोव्हेंबरअखेर मुदत देण्यात आली आहे. 

loading image
go to top