Accident: रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकने घेतला अचानक पेट, जळून खाक

कामती पोलिसांत रात्री उशिरापर्यंत घटना नोंद करण्याचे काम चालू होते | The work of registering the incident was going on till late night in the Kamti police
Accident
Accidentsakal

Accident: सोलापूरहून मंगळवेढ्याच्या दिशेने फरशी घेवून निघालेला व रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या मालट्रकने अचानक पेट घेतल्याने झालेल्या दुर्धटनेत संपुर्ण मालासह मालट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

ही घटना सोलापूर- मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील इंचगाव(ता.मोहोळ) गावाजवळील टोल नाका परिसरात गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजणेचे सुमारास घडली.या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान एका वर्षात घडलेली ही तिसरी घटना आहे.

Accident
गुजरातमध्ये दीड वर्षांपासून सुरु होता फेक टोल नाका; आतापर्यंत वसूल केले लाखो रुपये

या संदर्भात घटनास्थळा वरून मिळालेल्या माहिती नुसार राजू रेवन साखरे (वय 35 हल्ली रा.जळकोट) हा चालक एम.एच.25/ यु 3245 या क्रमांकाचा मालट्रक करीमनगर(हैद्राबाद)येथून मंगळवारी दुपारी ग्रॅनाइट फरशी घेवून शिरोली (जि.कोल्हापूर)येथे निघाला होता. दरम्यान चालक साखरे याने सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरील इंचगाव येथील टोलनाका पास केला व लघुशंकेसाठी अगदी टोल परिसरातच ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबविला कांही वेळात तो परत ही आला व पुढील प्रवासाकरीता ट्रकमध्ये चढत असताना ट्रकच्या डिझेल टाकीने व नंतर टायरने पेट घेतल्याचे त्याने पाहिले.

Accident
टोल नाका प्रकरणी संघर्ष सुरूच

दरम्यान काही क्षणातच संपुर्ण ट्रकने पेट घेतला.दरम्यान टोल नाक्यावरील कर्मचारी मदतीला धावले. कांही वेळातच कामती पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते.

पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत व पुढील अनर्थ टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांना दूर केले.दरम्यान आगीमुळे संपूर्ण ट्रक व आतील फरशी जळून खाक झाली. आगीच्या प्रखर ज्वाला दूर पर्यंत पसरलेल्या होत्या. कामती पोलिसांत रात्री उशिरापर्यंत घटना नोंद करण्याचे काम चालू होते.

Accident
Jalgaon Toll News : फागणे- पाळधीपर्यंतच्या महामार्गावरही टोल; 2 महिन्यांत नाका सुरू, तरी वसुलीची तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com