Solapur Accident : सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये अपघात; एकाचा मृत्यू
भिगवण (जि. पुणे) येथील तुषार धुमाळ (वय ३५) आणि वैभव अप्पा रुपनवर (डोंबाळवाडी, ता. माळशिरस) या दोघे पाळण्यात बसले होते. दोघांच्याही डोक्याला मार लागला. तुषार धुमाळ यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वैभव रुपनवर गंभीर जखमी आहेत.
अकलूज : आनंदनगर (ता. माळशिरस) येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये अक्टोपझी पाळण्यातून पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. रूग्णालयातील माहितीवरून अकलूज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.