Accident News : शेटफळ- पंढरपूर महामार्गावर अपघात चौघांचा मृत्यू, अन्य चौघे जखमी

जखमीवर पंढरपूर येथील ट्यूलिप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Accident News : शेटफळ- पंढरपूर महामार्गावर अपघात चौघांचा मृत्यू, अन्य चौघे जखमी
Accident Newsesakal

मोहोळ : ओमिनी व स्कोडा कार यांची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालातर अन्य चौघे जखमी झाले. हा अपघात शेटफळ- पंढरपूर महामार्गा वरील आष्टी शिवारात बुधवार ता 29 रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास झाला.

Accident News : शेटफळ- पंढरपूर महामार्गावर अपघात चौघांचा मृत्यू, अन्य चौघे जखमी
Dhule News : बळीराजाच्या ‘लेकी’ म्हसदीत केंद्रात अव्वल; गंगामाता विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

विशाल राजाराम माने वय 35 रा कासूरणे, सिद्धार्थ सूर्यवंशी वय सहा महिने रा लांडेवाडी ता खटाव, जगुबाई धनाजी सूर्यवंशी वय 55, सुवर्णा पांडुरंग बाबर वय 35, रा वाळे असे मृतांची नावे आहेत तर त्रिशा पांडुरंग बाबर रा मायणी, आत्मिका विशाल माने रा तारापूर, ऋतुजा विशाल माने रा तारापूर, सृष्टी अण्णा सूर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत. जखमीवर पंढरपूर येथील ट्यूलिप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार ओमिनी कार क्रमांक एम एच 12 एचएफ 3496 ही देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती. तर स्कोडा कार क्रमांक एम एच 01 बीके 8582 ही पंढरपूरहुन शेटफळच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहने आष्टी शिवारात येतात त्यांची समोरासमोर धडक झाली. त्यात वरील चौघे मृत झाले तर अन्य चारजण जखमी झाले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास अंमलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com