Dhule News : बळीराजाच्या ‘लेकी’ म्हसदीत केंद्रात अव्वल; गंगामाता विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Dhule : गंगामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवित विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
Principal Varsha Deore, senior teacher Narendra Deore and class teachers felicitating Nikita Nerkar and family members who came to the MHSADI center for the first time.
Principal Varsha Deore, senior teacher Narendra Deore and class teachers felicitating Nikita Nerkar and family members who came to the MHSADI center for the first time.esakal
Updated on

Dhule News : येथील केंद्रात दहावीच्या परीक्षेत वसमार (ता. साक्री) येथील शेतकरी कुटुंबातील वनश्री पुरस्कारप्राप्त गंगामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवित विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यंदा शेतकरी कन्यांनी म्हसदी केंद्रात प्रथम येत शेतकरी कुटुंबातील मुलेही मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. दरवर्षी गंगामाता कन्या विद्यालयात सामान्य, गरिब शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुलीच आघाडीवर असतात. ()

यंदा देखील अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तिन्ही विद्यार्थीनी शेतकरी कुटुंबातील असून, बाहेरगावच्या आहेत. सोमवारी (ता. २७) दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला अन् सायंकाळी वसमार शिवारातील शेतात जात मुख्याध्यापिका वर्षा देवरे, ज्येष्ठ शिक्षक एन. ए. देवरे व वर्ग शिक्षकांनी म्हसदी केंद्रात प्रथम आलेल्या निकीता दिनेश नेरकर, आई-वडील, आजी-आजोबांचा सत्कार केला.

गंगामाता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.३८ टक्के लागला आहे. निकिता दिनेश नेरकर हिने ९५ टक्के गुण मिळवत म्हसदी केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. मानसी सुनील पाटील (९३.८०) म्हसदी केंद्रात व विद्यालयात द्वितीय, तर कार्तिकी जितेंद्र देवरे व वेदिका सुनील शिंदे (९२.६०) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. (latest marathi news)

Principal Varsha Deore, senior teacher Narendra Deore and class teachers felicitating Nikita Nerkar and family members who came to the MHSADI center for the first time.
Dhule News : आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

विद्यालयातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त ११ विद्यार्थीनी, ८० टक्क्यांपेक्षा जास्त २५ विद्यार्थीनी, तर ७० टक्क्यांपेक्षा जास्त १३ विद्यार्थिनींनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका वर्षा देवरे, ज्येष्ठ शिक्षक एन. ए. देवरे, एम. एन. भामरे, आर. एस. पाटील, सी. व्ही. नांद्रे, एम. डी. साळुंखे, एस. बी. गावित, एस. के. शिरसाठ आदींचे मार्गदर्शन लाभले.

गुणवंतांच्या पाठीशी कौतुकाची थाप!

वनश्री पुरस्कारप्राप्त गंगामाता कन्या विद्यालयात वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शनपर व्याख्याने घेतली जातात. स्पर्धा परिक्षा, विविध खेळ व इतर क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थीनींच्या पाठीशी कौतुकाची थाप विद्यालयात देण्याची परंपरा आहे. दहावीत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा घरी जात सन्मान केला जातो. यातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढत असल्याचे मत मुख्याध्यापिका व शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

''ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अशावेळी सर्वच विषय शिकवताना काळजी घ्यावी लागते. गरिब कुटुंबातील विद्यार्थी जर गुणवत्ता यादीत येत असतील तर कुटुंबापेक्षा शिक्षकांना वेगळा आनंद होत असतो.''- व्ही. एन. देवरे, मुख्याध्यापिका, गंगामाता कन्या विद्यालय, म्हसदी

Principal Varsha Deore, senior teacher Narendra Deore and class teachers felicitating Nikita Nerkar and family members who came to the MHSADI center for the first time.
Dhule News: मुलांची ‘हिरो‘गिरी; पालकांना भुर्दंड! 18 वर्षाखालील, विनापरवाना दुचाकीचालक विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com