अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार! बार्शीतील घटना; दोघांना अटक | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार! बार्शीतील घटना; दोघांना अटक
अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार! बार्शीतील घटना; दोघांना अटक

अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार! बार्शीतील घटना; दोघांना अटक

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस बार्शी शहर (Barshi) बसस्थानकातून रात्रीच्या वेळी नेऊन मार्केट यार्डातील गोदामाच्या मागे पंधरा दिवस दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोस्को कायद्यानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात (Barshi Ciry Police Station) गुन्हा (Crime) दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा: WhatsApp यूजर्स सावधान! 'या' मिळत्याजुळत्या अ‍ॅपमुळे होईल मोठे नुकसान

सूरज कांबळे (वय 23, रा. पाटील चाळ, तुळजापूर रोड, बार्शी), सूरज ननवरे (रा. टिळक चौक, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना 15 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबरच्या दरम्यान घडली. अल्पवयीन पीडित मुलीने उस्मानाबाद पोलिसांत तक्रार दिली असता त्यांनी बार्शी शहर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की माझा मोबाईल का घेतला म्हणून वडिलांनी मारहाण केल्याने आई-वडील शेतात गेल्यावर उस्मानाबाद येथे गेले. तेथून परत बसने बार्शीला आले. बार्शी बसस्थानकावर बस उशिरा असल्याने मी थांबले होते. बस स्थानकाबाहेर नाश्‍ता घेण्यासाठी आले असता एकजण तेथे आला. त्याने नाव, गाव विचारले. मी ते सांगताच त्याने माझी मावशी तेथेच राहते, असे म्हणून त्याने वडापाव दिला. तुला दुचाकीवर गावाकडे सोडतो, असे सांगून बसवले व मार्केट यार्डात गोदामाच्या मागे अत्याचार केला. असे पंधरा दिवस त्याने व त्याच्या मित्राने अत्याचार केला. त्यानंतर लातूर रस्त्यावरील रेणुका थिएटर येथे नेऊन सोडले. तेथील चालक मालकिणीला आधार कार्ड आणून देतो, हिला घरकामाला ठेवा असे सांगितले आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी कपडे व साडी आणण्यासाठी पैसे त्यांनी घेतले होते.

हेही वाचा: मांसाहारी पुरुषांसाठी धक्कादायक बातमी! पर्यावरणास ठरताहेत धोकादायक

तेथे राहिल्यानंतरही काही कामाची नाही, हिला नाचता येत नाही असे म्हणून मारहाण करण्यात आली. त्या दोघांनी मला तेथून घेऊन परत घरी सोडतो असे सांगून गावाकडे घेऊन आले. त्या वेळी गावातच ओळखीची माहिला भेटताच दुचाकी थांबवली आणि काका व आईला बोलावून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे करीत आहेत.

loading image
go to top