
सोलापूर : वर्ष २०३० पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मानवी बुद्ध्यांकाएवढी असेल. मात्र एएसआयचे (आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स) युग येण्याचा काळ दशकावरून काही वर्षावर येऊन ठेपला आहे, असे अभ्यासपूर्ण मत एआय अभ्यासक आणि साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी मांडले. यावेळी श्री. गोडबोले यांनी चॅट जीपीटीने त्यांच्यावर केलेली कविता व कवितेचे तयार केलेले संगीतमय सादरीकरण ऐकून दाखवल्यावर रसिक देखील चकित झाले.