

MLA Subhash Deshmukh raises the issue of dance bars in Solapur during the Assembly session.
sakal
सोलापूर: सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील डान्सबारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी (ता. २४) विधानसभेमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी शहरासह ग्रामीण भागातील अवैध डान्सबार व ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. शहरात स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली काही ठिकाणी डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण डान्सबार कसे चालतात, याबाबतचा व्हिडिओ पोलिस आयुक्तांना पाठवला.