
सोलापूर : एमआयडीसीऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत असलेल्या सोलापूर अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीसह राज्यातील २४ वसाहती मूलभूत सुविधांअभावी संकटात सापडल्या आहेत. या संकटातून बाहेर काढण्यासाठी वसाहतींमधील उद्योजक प्रयत्न करू लागले आहेत. लवकरच यासाठी एक कृती समिती स्थापन करून या वसाहतींना नवा चेहरा देण्याचा प्रयत्न होणार आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील सकारात्मक आहेत.