esakal | Solapur : अवैध वाळू वाहतूक ! आता थेट बांधकाम करणाऱ्यांवरच कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करावयास गेलेले पोलिस कर्मचारी गणेश सोलंकर यांच्या मृत्यूनंतर महसूल खात्याने आता चोरट्या वाळूवर कारवाईचा फास आवळला आहे.

अवैध वाळू वाहतूक : आता थेट बांधकाम करणाऱ्यांवरच कारवाई!

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : अवैध वाळू वाहतुकीवर (Illegal sand transportation) कारवाई करावयास गेलेले पोलिस कर्मचारी गणेश सोलंकर (Ganesh Solankar) यांच्या मृत्यूनंतर महसूल खात्याने (Revenue Department) आता चोरट्या वाळूवर कारवाईचा फास आवळला आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांऐवजी आता बांधकाम सुरू असणाऱ्या नागरिकांवरच कारवाई करण्याचा सपाटा लावला असून, मंगळवेढ्यात (Mangalwedha) जवळपास वीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोरोना मृतांच्या कुटुंबाला 50 हजार! राज्यासाठी लागतील 7 हजार कोटी

तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या नेतृत्वाखाली दोन मंडलाधिकारी, पाच तलाठी, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. सध्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असतानाही भीमा नदीच्या पात्रात पाणी असल्यामुळे चोरट्यांनी सांगोला तालुक्‍यातील माण नदीतील वाळू उपसा करून पंढरपूर तालुक्‍यातील वाळू माफियांनी चढ्या दराने वाळू विकण्याचा सपाटा लावला आहे. नुकतीच तपकिरी शेटफळ येथील वाहनातून शिरसी मार्गावरून अवैध वाळू घेऊन जाताना कारवाईसाठी गेलेल्या पोलिस गणेश सोलंकर यांच्या अंगावर वाहन घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

हेही वाचा: पुन्हा जुळले 900 जोडप्यांचे संसार! लॉकडाउनमध्ये 2500 तक्रारी

यात शेजारच्या तालुक्‍यातील वाळू माफिया चर्चेत आले आहेत. परंतु, मंगळवेढ्यात ही घटना घडल्यामुळे मंगळवेढ्याची राज्यभर बदनामी झाली. दरम्यान, तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी गुंगारा देणाऱ्या वाहनधारकांना वगळून थेट बांधकामासाठी वाळू घेणाऱ्या नागरिकांवरच कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शहरातील बांधकाम करणाऱ्या नागरिकांकडून 20 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांना वाळूची पावती सादर करण्यास अडचणी आल्या तर काहींची तारांबळ उडाली. ही मोहीम आणखी पुढे चालू ठेवणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

loading image
go to top