esakal | Solapur : पुन्हा जुळले 900 जोडप्यांचे संसार ! लॉकडाउनमध्ये पती-पत्नीतील वादाच्या 2500 तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा जुळले 900 जोडप्यांचे संसार

महिला समुपदेशन केंद्राकडे आलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने विवाहबाह्य संबंध, दारूचे व्यसन, संशयी वृत्ती या कारणांमुळे अनेकांचे फुललेले संसार मोडकळीस आले होते.

पुन्हा जुळले 900 जोडप्यांचे संसार! लॉकडाउनमध्ये 2500 तक्रारी

sakal_logo
By
हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : येथील पोलिस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्रातील (Women's Counseling Center) हेल्पलाइनद्वारे लॉकडाउनच्या काळात पती-पत्नीतील वादाच्या दोन हजार 500 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 900 तक्रारींचा निपटारा करत मोडलेले संसार जुळवण्यात येथील समुपदेशन केंद्राला यश आले आहे.

महिला समुपदेशन केंद्राकडे आलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने विवाहबाह्य संबंध, दारूचे व्यसन, संशयी वृत्ती या कारणांमुळे अनेकांचे फुललेले संसार मोडकळीस आले होते. सध्या व्हॉटसऍप, फेसबुकचा जमाना असल्याने प्रत्येक मुलाकडे व मुलीकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असल्याचे चित्र आहे. मोबाईल म्हणजे जीवनाचा अविभाज्य अंग बनला असून, हाच मोबाईल सुखी संसारामध्ये विघ्न ठरत आहे. चॅटिंग केल्याच्या संशयी वृत्तीमुळे संशय वाढत जाऊन संसार मोडकळीस आल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा: सकाळी साडेदहा ते पाचपर्यंत शाळा ! एका बेंचवर एकच विद्यार्थी, जाणून घ्या नियमावली

कोरोनामुळे लॉकडाउन काळात प्रत्यक्ष तक्रारदार पती - पत्नींना समुपदेशन केंद्रात येऊन तक्रार दाखल करणे अशक्‍य असल्याने त्या तक्रारी हेल्पलाइनद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याची संख्या 2500 इतकी झाली होती. लॉकडाउनमध्ये पुरुष मंडळींना काम नसल्यामुळे तसेच घरी बसून राहिल्यामुळे अनेक ठिकाणी पती - पत्नीमध्ये विविध कारणांवरून कुरबुरी झाल्या. दाखल तक्रारींमध्ये 15 टक्के तक्रारी या दारूच्या व्यसनाच्या तर 50 टक्के तक्रारी या संशयी वृत्तीच्या दाखल आहेत. समुपदेशन केंद्रात दोन्हीही बाजूच्या लोकांना बोलावून संसाराच्या बांधलेल्या गाठी तुटण्यामागील कारणांचा शोध घेऊन सासर व माहेरकडील दोन्ही मंडळींच्या मनाचे परिवर्तन करून तुटलेला संसार जोडण्याचे काम करण्यात आले.

हेही वाचा: परदेशात लांबोटी चिवड्याचा ब्रॅण्ड! रुक्‍मिणीबाईंची अविस्मरणीय कामगिरी

1 नोव्हेंबर 2012 पासून सुरू झालेल्या केंद्राचे कामकाज लॉकडाउनमुळे बंद झाले. ते कामकाज पुन्हा 1 सप्टेंबर 2021 पासून प्रत्यक्षरीत्या सुरू झाले असून, या कालावधीत 60 तक्रारी विभावरी कसबे व वैशाली गायकवाड यांनी रजिस्टरवर नोंदवून घेतल्या. ज्या विवाहित महिलांच्या तक्रारी असतील त्यांनी धाडसाने पुढे येऊन समुपदेशन केंद्रात तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून समुपदेशन करून तुटलेला संसार जोडण्याची संधी नव्याने प्राप्त होईल, असे आवाहन विभावरी कसबे यांनी केले.

loading image
go to top